Join us  

टिटवाळा लेव्हल क्रॉसिंग गेट ५१च्या उड्डाणपूलाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते लोकार्पण

By अनिकेत घमंडी | Published: February 26, 2024 7:32 PM

मध्य रेल्वे व कल्याण-डोंबिवली महापालिकेने एकत्र येऊन ५०कोटी ५४ लाख रुपयांचा हा पूल बांधला आहे.

डोंबिवली: टिटवाळा पूर्व  पश्चिम भाग जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाचे (आरओबी) लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ५१ येथील लोकार्पण सोमवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी केंद्रिय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती. मध्य रेल्वे व कल्याण-डोंबिवली महापालिकेने एकत्र येऊन ५०कोटी ५४ लाख रुपयांचा हा पूल बांधला आहे. 

त्या वेळी माजी आमदार नरेंद्र पवार, महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनिशकुमार गोयल, माजी उपमहापौर सौ. उपेक्षा भोईर, शक्तिवान भोईर, प्रदीप भोईर यांची उपस्थिती होती. या पुलाच्या कामासाठी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून पाठपुरावा केला जात होता. या कामामुळे टिटवाळा पश्चिम परिसराच्या विकासाला वेग येणार आहे. टिटवाळा येथील गेटवर वाहतूक कोंडी होत होती. अखेर रेल्वे व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ५०कोटी चोपन्न लाख रुपये खर्च करून ८४१ मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला, त्याचे लोकार्पण रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :भारतीय रेल्वेरावसाहेब दानवे