Join us  

'टायगर’चे नवे उत्पादन आता वंगण आणि दर्प विरहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 3:41 PM

टायगर बाम आता हाताला चिकटणारही नसून द्रव्य रुपात असेल.

मुंबई: डोकेदुखी असो, खांदेदुखी असो, कंबरदुखी असो  किंवा अगदी पाठदुखी असो. त्यावर नेहमीच रामबाण उपाय ठरतो तो म्हणजे बाम. मात्र, बाम म्हटलं की, तेलकट, चिकट आणि उग्रवासाने डोकेदुखी वाढण्याबरोबर डोळ्यांची जळजळ होणे, हे सर्वसामान्य चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र याच प्रतिमेला छेद देत टायगर बाम रब आता वंगण आणि दर्प विरहीत उपलब्ध होणार आहे. 

अनेक वर्षे केलेल्या संशोधनात “टायगर बाम नेक अँड शोल्डर रब आता उग्रवास आणि वंगण विरहीत करण्यात कंपनीला यश आले आहे. जगभरातील बाम तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी पहिल्यांदाच अशा प्रकारे संशोधनाला यश आले आहे. इतकच नव्हे तर टायगर बाम रब आता सुगंधी लेव्हेंडर फुलाप्रमाणे दरवळणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर टायगर बाम आता हाताला चिकटणारही नसून द्रव्य रुपात असणार असल्याचे बाम पार कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक ए. के. हान यांनी सांगितले. तर अल्केम ही कंपनी टायगर बाम उत्पादनाचे वितरक असेल.

भारतीय तरूणांमध्ये स्मार्टफोनचा वापर करण्यात आघाडीवर आहेत. यात त्यांना मानदुखी आणि खांदे दुखीच्या त्रासाला सर्वाधिक सामोरे जावे लागते. ह्याच गोष्टी लक्षात घेऊन आम्ही टायगर बाम नेक अँड शोल्डर रब तयार केला असल्याचे हान यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईऔषधं