सार्वजनिक खाजगी सहभागातुन ४० लक्ष हेक्टरवर झाडे लावता येतील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 06:54 PM2020-05-31T18:54:02+5:302020-05-31T18:54:27+5:30

राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगतच्या हद्दीतील जागेवर झाडे लावणे, जगवणे, व त्यासाठी सार्वजनिक खाजगी सहभाग या संकल्पनेचा वापर करणे जे सहजासहजी शक्य आहे.

Through public-private partnership, trees can be planted on 40 lakh hectares | सार्वजनिक खाजगी सहभागातुन ४० लक्ष हेक्टरवर झाडे लावता येतील

सार्वजनिक खाजगी सहभागातुन ४० लक्ष हेक्टरवर झाडे लावता येतील

Next


मुंबई : राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगतच्या हद्दीतील जागेवर झाडे लावणे, जगवणे, व त्यासाठी सार्वजनिक खाजगी सहभाग या संकल्पनेचा वापर करणे जे सहजासहजी शक्य असून, देशात राष्ट्रीय महामार्गाची एकुण लांबी १ लाख ३१ हजार ३२६ किलो मीटर असून, गेल्या पाच वर्षात ३९ हजार ४० किमीची वाढ यात झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्गाखाली खाली असणा-या जागेचे क्षेत्रफळ लाखो हेक्टरच्या घरात असून, २० मीटर रूंद जागा रस्त्यासाठी वापरणार असतील तर उर्वरित १० मीटर रुंदीत झाडे लावता येतील. जगवता येतील. काम पुढे जाईल. म्हणजे जवळपास ४० लक्ष हेक्टरवर सार्वजनिक खाजगी सहभागातुन झाडे लावणे शक्य असल्याची माहिती पायाभूत सेवा सुविधा क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

सार्वजनिक खाजगी सहभागातुन भारत सरकारने राष्ट्रीय महामार्गावर झाडे लावणे व ती जगविणे गरजेचे असून, याबाबत अधिक माहिती देताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता विवेक नृसिंह घाणेकर यांनी सांगितले की, पृथ्वीचा ७० टक्के भाग पाण्याखाली आहे. तर ३० टक्के भाग जमीनीखाली आहे जगात मान्य असणा-या निकषांनुसार कोणत्याही देशाच्या क्षेत्रफळाच्या किमान ३३ टक्के जागेवर तरी झाडे हवीत. मात्र भारतात त्याचे प्रमाण फक्त २१.५४ टक्के इतके आले आहे २०३० पर्यंत जगातील ४०.७६ टक्के इतकी लोकसंख्या शहरात वास करत असेल, असा अंदाज आहे. भारतात तर हे प्रमाण अधिकच असेल. अशा परिस्थितीत, जमीन तर तेवढीच आहे पण तिचा शहरीकरणासाठी वापर वाढत आहे. त्यासाठी झाडे तुटत आहेत, निसगार्चा -हास होत आहे. त्यामुळे त्यासाठी जमीन तुमची झाडे आपली ही संकल्पना राबविणे आवश्यक आहे. यासाठी करायचे काय तर ज्या माणसांकडे जमीनी आहेत पण पैसे नाहीत, व ज्यांना झाडे लावायची आहेत असे लोक की ज्यांचेकडे पैसे आहेत व झाडे लावणे आणि जगवण्याची ईच्छा आहे. या दोन लोकांनी एकत्र यावे आणि झाडे लावण्याची संकल्पना अंमलात आणावी. मात्र अशी योजना करण्यासाठी एकतर शासनाने पुढे आले पाहिजे. अथवा एखाद्या संस्थेने पुढाकार घेतला पाहिजे.

..................................

झाडे लावण्यासाठी निधी दया
एक वृक्षसंवर्धन संस्था कायम करावी. संस्थेने एकीकडे खाजगी व्यक्ती, संस्था, कंपन्या, एन.जी.ओ., वनीकरण संघटना, वृक्षप्रेमी, ज्यांना झाडे लावायची वा जगवायची आहेत असे लोक, यांना आवाहन करावे की तुम्ही झाडे लावण्यासाठी निधी दया, या निधीचा विनीयोग झाडे प्रत्यक्षत:  राष्ट्रीय महामार्गाकडेने लावण्यासाठी होईल. संवर्धनाची व ती जगवण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग संस्था घेईल.


..................................

संवर्धन होणे शक्य
राष्ट्रीय महामार्ग संस्थेने आपली राष्ट्रीय महामार्गालगतची जमीन झाडे लावणा-या या संस्थेस/कंपनीस कायदेशीरित्या उपलब्ध करून दयावी. त्यावर संबधितांनी झाडे लावावीत, झाडे लावण्यासाठी आणि जगवण्यासाठी, जो खर्च लागेल तो टप्याटप्याने ५ वर्षाच्या कालावधीत, राष्ट्रीय महामार्ग संस्थेच्या अधिका-यांनी ही कामे करणा-या संस्थेस दयावा. कारण जी झाडे लावली जाणार आहेत ती ७ वर्ष टिकवायची आहेत. तरच तिचे संवर्धन होणे शक्य होणार आहे.

Web Title: Through public-private partnership, trees can be planted on 40 lakh hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.