Three women injured in collapse of Sky Walk's acrylic Sheet | Mumbai Rain Update : वांद्रे येथे स्कायवॉकचा भाग कोसळून तीन महिला जखमी 
Mumbai Rain Update : वांद्रे येथे स्कायवॉकचा भाग कोसळून तीन महिला जखमी 

ठळक मुद्दे मालिसा नजरात (30) , सुलक्षणा वझे (41) , तेजल कदम (27) अशी जखमी महिलांची नाव ही दुर्घटना आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

मुंबई - वांद्रे पश्चिम येथील एस. व्ही. रोड येथील स्कायवॉकच्या अ‍ॅक्रॅलिक शीट खाली कोसळून अपघात झाला असून या दुर्घटनेत तीन महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेनंतर जखमी महिलांना नजीकच्या हॉली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या तिघांची देखील प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. 

मुंबईत वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे स्कायवॉकला लावण्यात आलेली अ‍ॅक्रॅलिक शीट  निखळून खाली चालत असलेल्या तीन पादचाऱ्यांवर पडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मालिसा नजरात (30) , सुलक्षणा वझे (41) , तेजल कदम (27) अशी जखमी महिलांची नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेची वाहतूक पोलिसांनी दखल घेत उपचारासाठी तिघांनाही रुग्णालयात दाखल केले आहे. आज दिवसभरातील ही दुसरी घटना असून आज दुपारी चर्चगेट येथे होर्डिंगचा भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

English summary :
Acrylic Sheet of the Bandra Sky Walk near the SV Road, Bandra West is collapsed and the primary information is that three women were injured in the accident. After the incident, the injured women were admitted to the nearby Holly Family Hospital and they are undergoing through treatment.


Web Title: Three women injured in collapse of Sky Walk's acrylic Sheet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.