कांदा बियाणे तीन हजार रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 02:21 AM2020-09-07T02:21:03+5:302020-09-07T02:21:10+5:30

कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण राज्यात उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत.

Three thousand rupees per kg of onion seeds! | कांदा बियाणे तीन हजार रुपये किलो!

कांदा बियाणे तीन हजार रुपये किलो!

googlenewsNext

- योगेश बिडवई

मुंबई : खरिप कांद्याच्या लागवडीला चांगला उतारा मिळत नसल्याचे लक्षात येताच रब्बी कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांच्या बियाण्यांवर उड्या पडल्या आहेत. मात्र नाशिकसह राज्यभरात कांदा बियाणांची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दर तब्बल दुप्पट म्हणजे तीन हजार रुपये किलो झाले आहेत.

कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण राज्यात उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. त्यातच खरिपाच्या कांदा लागवडीला फटका बसला आहे. आॅगस्टपासूनच शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची रोपे तयार करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास संस्थेच्या (एनएचआरडीएफ) नाशिक जिल्ह्यातील केंद्रांसहराज्यातील इतर कृषी सेवा केंद्रांबाहेर बियाणे खरेदीसाठी शेतकºयांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. एनएचआरडीएफ केंद्रावरपोलीस बंदोबस्तात बियाणे विक्री सुरू आहे. माणसी सहा किलोच बियाणे शेतकºयांना मिळाले.

एनएचआरडीएफच्या नाशिक प्रादेशिक केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ. आर. सी. गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता, कोरोना रुग्ण आढळल्याने त्यांची निवासी इमारत प्रतिबंधित केल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपासून कार्यालयात न गेल्याचे ते म्हणाले. तर यावर्षी उन्हाळ कांदा लागवडीचा खर्च एकरमागे ५० हजारांच्या घरात जाईल, असे दुगाव (चांदवड, नाशिक) येथील शेतकरी प्रकाश सोनवणे यांनी सांगितले.

गेल्या वर्षी साधारण ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांदा लागवड झाली होती. अतिवृष्टीने त्यातील ४0 टक्के पिकाचे नुकसान झाले.
कांद्याचे कमी उत्पादन झाल्याने भावात तेजी होती. त्यामुळे बहुसंख्य शेतकºयांनी रोपे तयार करण्यास कांदा न ठेवता विकला.
दरवर्षी साधारणपणे १२ हजार टन कांदा बियाणे लागते. त्यात रब्बीसाठी ७,२00 तर खरिप हंगामासाठी ४,८00 टन बियाणे लागते.
गेल्या वर्षी एनएचआरडीएफच्या कांदा बियाणांचे दर १,३00 ते १,४00 रुपये किलो होते. यंदा ते २,३00 रुपये किलो झाले. तर खासगी कंपन्यांचे बियाणे १७00-१८00 वरून किलोमागे तीन हजारांच्या पुढे गेले आहे. - नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड

Web Title: Three thousand rupees per kg of onion seeds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.