Join us  

आणखी तीन साक्षीदार फितूर, सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 2:22 AM

सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक खटल्यातील आणखी तीन साक्षीदारांना विशेष न्यायालयाने गुरुवारी फितूर जाहीर केले. त्यामुळे आतापर्यंत साक्ष देण्यासाठी आलेल्या ४६ साक्षीदारांपैकी ३४ साक्षीदार फितूर झाले आहेत.

मुंबई : सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक खटल्यातील आणखी तीन साक्षीदारांना विशेष न्यायालयाने गुरुवारी फितूर जाहीर केले. त्यामुळे आतापर्यंत साक्ष देण्यासाठी आलेल्या ४६ साक्षीदारांपैकी ३४ साक्षीदार फितूर झाले आहेत.अहमदाबादच्या सीमेवरील फार्म हाउसवर सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसर बी व तुलसीराम प्रजापती यांना ठेवले होते. या फार्महाउसची तपासणी सीबीआयने तीन जणांच्या समक्ष घेतली. मात्र, गुरुवारी विशेष न्यायालयात या तिन्ही पंचांनी सीबीआयने आपल्या समक्ष फार्महाउसची झडती न घेता, पोलीस कार्यालयातच पंचनाम्यावर सह्या घेतल्याचे सांगितले. त्यावर सीबीआयच्या वकिलांनी या पंचांना ‘फितूर’ जाहीर करण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्यही केली.एम. एन. दिनेश यांनी आरोप फेटाळलेराजस्थानचे आयपीएस अधिकारी एम. एन. दिनेश यांनी सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीत आपला काहीही हात नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. डी. जी. वंजारा यांची भेट घेण्यापूर्वी पोलीस महासंचालकांची परवानगी घेतल्याचेही त्यांनी सांगितले. वंजारा यांच्यासह दिनेश अन्यही केसेसप्रकरणी वरिष्ठ अधिकाºयांच्या संपर्कात होते. ते त्यांचे कर्तव्य आहे. दिनेश हे वंजारा यांच्या संपर्कात होते आणि त्यामुळे ते या कटात सहभागी होते, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. गुजरातला भेट देण्यापूर्वी पोलीस महासंचालकांची परवानगी घेतली होती. तिथे ते प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यामुळे गुजरातला ते कार्यालयीन कामानिमित्त गेले नव्हते, असे म्हणणे अयोग्य आहे, असा युक्तिवाद दिनेश यांचे वकील राजा ठाकरे यांनी केला.- सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीनने आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा, एम. एन. दिनेश यांच्या तर सीबीआयने एन. के. आमीन, हवालदार दलतपसिंह राठोड यांच्या आरोपमुक्ततेला न्यायालयात आव्हान दिले आहे.

टॅग्स :न्यायालय