हजार बेस्ट बसगाड्या भंगारात, बस फेऱ्यांवर परिणाम होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 03:09 AM2019-11-27T03:09:55+5:302019-11-27T03:10:13+5:30

भाडेकपातीमुळे प्रवाशांची संख्या वाढल्यानंतरही बसगाड्यांचा ताफा मात्र वाढलेला नाही.

Thousands of the best buses in the wreckage | हजार बेस्ट बसगाड्या भंगारात, बस फेऱ्यांवर परिणाम होणार

हजार बेस्ट बसगाड्या भंगारात, बस फेऱ्यांवर परिणाम होणार

Next

मुंबई : भाडेकपातीमुळे प्रवाशांची संख्या वाढल्यानंतरही बसगाड्यांचा ताफा मात्र वाढलेला नाही. याचा परिणाम बस फेऱ्यांवर होत असून बेस्ट उपक्रमाचे आर्थिक नुकसान वाढत आहे, परंतु पुढील दीड वर्षामध्ये १,०६३ बसगाड्या भंगारात निघणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर बस ताफा वाढविण्याचे आव्हान बेस्ट प्रशासनापुढे आहे.

बेस्ट उपक्रमात ३,२०० बसगाड्या आहेत. जुलै महिन्यात बसभाड्यांमध्ये मोठी कपात करताना नवीन एक हजार बसगाड्या घेण्याचे लक्ष्य बेस्ट प्रशासनाने ठेवले होते, परंतु या बसगाड्यांची खरेदी लांबणीवर पडली असून, प्रवाशी संख्या मात्र ११ लाखांनी वाढली आहे. त्याच वेळी वयोमर्यादा संपलेल्या बसगाड्या एका मागोमाग एक भंगारात निघत असल्याने बस फेºया कमी झाल्या आहेत.

येत्या १६ महिन्यांच्या कालावधीत १,०६३ बसगाड्या भंगारात काढण्यात येणार आहेत. यामध्ये डिझेलवर चालणा-या ८७० सिंगल डेकर तर १२० सीएनजीवर चालणाºया बसगाड्यांचा समावेश आहे. यापैकी १६७ बसगाड्या मार्च, २०२० पर्यंत तर उर्वरित बसगाड्या मार्च, २०२१ पर्यंत भंगारात काढण्यात येणार आहेत. यामध्ये ७२ डबल डेकर बसगाड्यांचाही समावेश आहे.

पूर्वीचा बसताफा ४,२००
सध्या बसताफा ३,२००
दररोजचे प्रवासी २८ लाख
दीड वर्षांत १,०६३ बसगाड्या भंगारात.
डिझेलवरील - ८७० सिंगल डेकर
सीएनजीवर - १२० सिंगलडेकर
डबलडेकर - ७२

Web Title: Thousands of the best buses in the wreckage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.