Join us  

मुदत संपली तरी पदाचा मोह सुटेना

By अतुल कुलकर्णी | Published: September 19, 2018 6:00 AM

प्रतिनियुक्तीनंतरही सिध्दीविनायक मंदिराचे अवर सचिव कायम

मुंबई : सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या उप कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक करण्यात आलेले मंत्रालयातील अवर सचिव र. म. जाधव यांच्या नेमणुकीची मुदत ११ सप्टेंबर रोजी संपली तरी त्यांनी हे पद सोडलेले नाही.२५ मे २००० पासून जाधव विविध ठिकाणी प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांच्या मुदतवाढीस काही विश्वस्तांचा विरोध आहे. अवर सचिव पदावर त्यांना पदोन्नती मिळाली पण काम मंदीर न्यासाचेच दिले गेले. वास्तविक त्यांच्या जागी ११ मार्च रोजी बांधकाम विभागातील कक्ष अधिकारी प्र.भा. देसाई यांंची दोन वर्षासाठी नियुक्ती करणारी फाईल विधि व न्याय विभागाने तयार केली होती. त्याहीवेळी जाधव यांना सहा महिने मुदतवाढ दिली गेली. मुदतवाढीच्या त्या आदेशातच ११ सप्टेंबर नंतर जाधव यांनी मंत्रालयातील अवर सचिव पदावर रुजू होणे आवश्यक आहे असे स्पष्ट नमूद केले होते. तरीही अद्याप मंदिरातील पद सोडलेले नाही. याबद्दल जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, मला विधि व न्याय विभागाच्या आदेशाशिवाय मी पदभार कसा सोडणार?मुख्यमंत्र्याचा तो आदेश असूनही प्रयत्न२५ मे २००० पासून जाधव विविध ठिकाणी प्रतिनियुक्तीवर आहेत. १० वर्षे सलग प्रतिनियुक्तीवर असणाऱ्यांना पुन्हा पद न देण्याचा मुख्यमंत्र्यांनी आदेश काढला आहे. तरी मंदिरात पुन्हा नियुक्ती मिळवण्याचे प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :सिद्धिविनायक गणपती मंदिर