Join us

थर्माकोलच्या मखराला पसंती

By admin | Updated: August 27, 2014 00:12 IST

गणरायाचे आगमन अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपले असून शहरात मोठ्या प्रमाणात गणराजाच्या सजावटीसाठी आकर्षक मखरे बनविली जात आहेत.

शशिकांत ठाकूर, कासागणरायाचे आगमन अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपले असून शहरात मोठ्या प्रमाणात गणराजाच्या सजावटीसाठी आकर्षक मखरे बनविली जात आहेत. कालपर्यंत झाडा- वेलींपर्यंत मर्यादित असलेला ग्रामीण भाग आता थर्माेकोलच्या सजावटीकडेही वळू लागला आहे. कासा भागात सजावटीसाठी आदिवासी व ग्रामीण भागातील पाड्यापाड्यावरची गणेश मंडळे सजावटीसाठी थर्माेकोलच्या मखरांची मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत. कासा, सायवन यांसारख्या आदिवासी भागातील गणेशमंडळे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत नसल्याने ती सजावटीसाठी पुरेपुर खर्च करू शकत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील परंपरेनुसार कागदी किंवा आंब्याच्या पानांच्या पताका व केळींच्या पानांचे व पात्यांचे मखर बनवून त्याचा वापर केला जायचा. यात देवाच्या डोक्यावरील माटोळीचीही महत्त्वाची भूमिका असते, मात्र आता थर्माेकोलच्या वस्तूंना मागणी वाढली आहे. गेल्या वीस वर्षापासून महेंद्र पवार हे ग्रामीण व आदिवासी भागात अशा गरीब मंडळांसाठी थर्मोकोलची ३५ ते ४० सुंदर मखरे बनवितात. पवार हे कासा हायस्कूलमध्ये कला शिक्षक असून थर्माेकोलवरील रथ, सिंहासन, गड, किल्ले, मंदिरे अशा सुंदर कलाकृती बनवितात. कासा परिसरात शहरातून गणरायाच्या सजावटीसाठी मखर न आणू शकणाऱ्या गरीब गणेश मंडळांना अल्प किंमतीत मखर देतात.