काळी पिवळया टॅक्सीवर दिवे लागणार; टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 01:22 AM2020-01-14T01:22:20+5:302020-01-14T06:28:10+5:30

मुंबई : प्रवाशांना अनेकदा टॅक्सी चालकांची मुजोरी सहन करावी लागते. कित्येकवेळा चालक विनाकारण भाडे नाकारतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते ...

There will be lights on the black yellow taxi; Taxi driver's wages will be up for grabs? | काळी पिवळया टॅक्सीवर दिवे लागणार; टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप बसणार?

काळी पिवळया टॅक्सीवर दिवे लागणार; टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप बसणार?

Next

मुंबई : प्रवाशांना अनेकदा टॅक्सी चालकांची मुजोरी सहन करावी लागते. कित्येकवेळा चालक विनाकारण भाडे नाकारतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते परंतु चालकांच्या या मुजोरीला आता चाप बसणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या टपावर आता तीन प्रकारचे दिवे लावण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. त्यामुळे ती टॅक्सी उपलब्ध आहे कि नाही याची माहिती मिळणार आहे. १ फेब्रुवारीपासून नोंदणी करताना या नव्या नियामाची अंमलबजावणी सुरु होणार आहे.राज्य सरकारने यासंदभार्तील अधिसुचना यापूर्वीच जाहीर केली असल्याचे वाहतूक आयुक्त शेखर चन्ने यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सांगितले. चन्ने म्हणाले, अशा प्रकारे तीन दिवे लावलेल्या टॅक्सींना प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून नव्या आॅटो रिक्षांवरही अशा प्रकारे दिवे लावण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.टॅक्सींच्या टपावर आता तीन प्रकारचे दिवे लावण्यात येणार असून यामध्ये हिरवा ,लाल आणि पांढरा दिवा लावला जाणार आहे. हिरवा भाड्यासाठी उपलब्ध , लाल प्रवासी आहे तर पांढरा भाड्यासाठी उपलब्ध नाही यासाठी आहे. या दिव्यांसोबतच मराठी आणि इंग्रजीमध्ये अक्षरेही दिसणार आहेत.

Web Title: There will be lights on the black yellow taxi; Taxi driver's wages will be up for grabs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxiटॅक्सी