...मग गांधीही फक्त गुजरातचे?; डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद दौऱ्यावर मनसेचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 04:58 PM2020-02-12T16:58:59+5:302020-02-12T17:00:10+5:30

अहमदाबाद शहरात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार होत आहे.

... Then Gandhi only from Gujarat?; MNS objected to Donald Trump's visit to Ahmedabad | ...मग गांधीही फक्त गुजरातचे?; डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद दौऱ्यावर मनसेचा आक्षेप

...मग गांधीही फक्त गुजरातचे?; डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद दौऱ्यावर मनसेचा आक्षेप

Next

मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४-२५ फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली आहे. अमेरिका आणि भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी या दौऱ्याचं नियोजन आहे. मात्र या दौऱ्याच्या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प यांना अहमदाबादलाही भेट देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनसेकडून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. 

मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी ट्विट करुन म्हटलंय की, ट्रम्प अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद, त्या कार्यक्रमाचे नाव केम छो मिस्टर प्रेसिंडेंट? हे केम छो का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. 

तसेच गुजरातचं का? ह्यावर व्हाईट हाऊसच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे की गुजरात मोदींचं राज्य आहे आणि गांधीच्या जीवनावर गुजरातनी मोठा परिणाम केला म्हणून ट्रम्प गुजरातला जाणार आहेत. मोदींचं राज्य हे समजलं पण गांधीही फक्त गुजरातचे? मग गांधीजी साबरमती आश्रम असताना सेवाग्रामला का आले? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. 

अहमदाबाद शहरात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार होत आहे. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियम आता सरदार वल्लभभाई स्टेडियम म्हणून ओळखलं जाणार असून त्याची प्रेक्षकक्षमता 1.10 लाख इतकी आहे. 2015साली 53000 प्रेक्षकक्षमता असलेलं मोटेरा स्टेडियम पाडून नवं स्टेडियम बांधण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या या स्टेडियमचं उद्धाटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

या स्टेडियमवर वर्ल्ड इलेव्हन आणि एशिया इलेव्हन असा ट्वेंटी-20 सामना खेळवण्यात येणार होता. पण, स्टेडियमचं काम वेळेत पूर्ण होत नसल्यानं हा सामना हलवण्यात आला. येत्या 24 व 25 फेब्रुवारीला ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत आणि त्या दरम्यान ते या स्टेडियमचं उद्धाटन करतील. त्यानंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांची भव्य रॅलीही काढण्यात येणार आहे. ट्रम्प यांनी सांगितले की,''अहमदाबाद विमानतळ ते स्टेडियमपर्यंत 5 ते 7 लाख लोकं उपस्थित राहणार आहेत. हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. ते जवळपास बांधून तयार आहे.''  
 

Web Title: ... Then Gandhi only from Gujarat?; MNS objected to Donald Trump's visit to Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.