Join us

अभिनेत्रीच्या पार्टीत चोरी करणारे अटकेत

By admin | Updated: July 2, 2017 04:33 IST

सिने अभिनेत्री उपासना सिंह हिच्या पार्टीत शिरुन पर्सची चोरी करणाऱ्या दोघा भामट्यांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. वीरेंद्र व दीपक अशी

लोकमत न्युज नेटवर्कमुंबई : सिने अभिनेत्री उपासना सिंह हिच्या पार्टीत शिरुन पर्सची चोरी करणाऱ्या दोघा भामट्यांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. वीरेंद्र व दीपक अशी त्यांची नावे असून हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन पोलिसांनी छडा लावला. हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम करणाऱ्या उपासना सिंह हिने २९ जूनला @वाढदिवसानिमित्त वर्सोव्यातील ‘द व्यू थिएटर’ हॉटेलमध्ये पार्टी दिली होती. पार्टीला आलेल्या यातील गायिका हॅप्पी राय आणि मॉडेल काया शर्मा यांची पर्स घेऊन दोघेजण पळून गेले. पर्समध्ये मोबाईलसह २० हजारांहून अधिक रुपये होते. मात्र हॉटेलपासून काही अंतरावर नाकाबंदी सुरू असल्याने पर्समधील ऐवज काढून घेऊन त्या तिथेच टाकून ते पसार झाले. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चौकशीअंती दोघांना ताब्यात घेतले.