Join us  

मतदार संघातील शिवसैनिकांची साथ माझ्यासाठी मोलाची - अमोल कीर्तिकर

By मनोहर कुंभेजकर | Published: March 15, 2024 6:37 PM

बैठकांना स्वतः अमोल कीर्तिकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

मुंबई-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी गेल्या शनिवारी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा शाखांमधील भेटींमधून जाहिर केलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार व शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांची प्राथमिक बैठकींना जोमाने सुरुवात झालेली आहे.

या बैठकांना स्वतः अमोल कीर्तिकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. मला कदाचित घरातून राजकीय साथ नाही,मात्र मतदार संघातील शिवसैनिकांची साथ माझ्यासाठी मोलाची असून त्यांच्या जोरावर मी येथून खासदार म्हणून विजयी होईल अशी साद ते शिवसैनिकांना घालत आहे.

आता शिवसेना शाखा शाखांच्या बैठका सुरू असून अमोल कीर्तिकर उपस्थित राहून मार्गदर्शन करत असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानपरिषद आमदार व या मतदार संघाचे निरीक्षक विलास पोतनीस यांनी लोकमतला सांगितले.आता पर्यंत गोरेगावच्या पाच शाखा,जोगेश्वरी पूर्वच्या चार शाखांच्या बैठका झाल्या असून आणि आज दिंडोशीच्या चार शाखांच्या बैठका होणार असल्याची माहिती पोतनीस यांनी दिली.

दरम्यान अमोल कीर्तिकर यांनी आतापर्यंत या मतदार संघातील सहा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विभागप्रमुख व आमदार अँड.अनिल परब आणि विभागप्रमुख व आमदार सुनील प्रभू आणि आमदार विलास पोतनीस यांच्या प्रमुख  उपस्थितीत अंधेरी पश्चिम आणि गोरेगाव पश्चिम येथे बैठका घेतल्या आहेत. 

तर या आठवड्यात अंधेरी पश्चिम येथे अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम व वर्सोवा व गोरेगाव पश्चिम येथे जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पश्चिम आणि दिंडोशी या सहा विधानसभेत झालेल्या बैठका संपन्न झाल्या. यावेळी विधानसभा संघटक महिला/ पुरुष, समन्वयक महिला/ पुरुष, उपविभागप्रमुख महिला/ पुरुष, शाखाप्रमुख महिला / पुरुष, तसेच शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेतील प्रमुख पदाधिकारी व युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :शिवसेनाराजकारण