ठाणे : पाच लाखांमध्ये शस्त्रपरवाना विकून अधिकृत शस्त्र कारखान्यातून शस्त्र मिळवून देणााऱ्या सहा जणांच्या एका टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून २७ शस्त्र परवाने आणि १२ रायफलींसह ३१ अग्निशस्त्रे आणि ३६५ काडतुसे अशी ४० लाखांची शस्त्र जप्त केल्याची माहिती सह पोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली.विश्वनाथ शेट्टी, मुडसिंग राजपूत, सुजानसिंग राजपूत, परविनसिंग सोलंकी, राजेंद्र भाटी आणि संतोषसिंग जयप्रकाश सिंग अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. भार्इंदर, मीरारोड आणि पालघर या भागातील ते रहिवासी आहेत. त्यांना ठाणे न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मीरानिधान सिंग संतोकसिंग रा. मीरा रोड, ठाणे याच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे, रामराव ढिकले यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत त्याच्या कारमध्ये पंजाब राज्यातून वितरीत केलेले विविध व्यक्तींच्या नावावर आठ शस्त्र परवाने मिळाले. त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ठाणे आणि परिसरातील ४० ते ४५ व्यक्तींना बनावट शस्त्र परवाने दिल्याचेही उघड झाले. त्याच माहितीच्या आधारे पंजाबच्या अमृतसर आणि तरनतारन येथील शस्त्र कारखान्यातून बनावट कागदपत्रांच्या आधारे या टोळीने शस्त्र मिळविल्याचे उघड झाले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आठ वर्षांपासून सुरू होता प्रकारकाही लाखांमध्ये बनावट परवाना विकून त्याला पंजाबच्या कारखान्यातून शस्त्रेही मिळवून दिली जात होती. गेल्या आठ वर्षांपूर्वी त्यांनी हा ‘उद्योग’सुरु केला. चार ते पाच लाखांत ही टोळी परवाना विकायची. आरोपींमध्ये निधानसिंग हा मुख्य तर उर्वरीत सहा जण बनावट शस्त्र परवाना घेणारे आहेत.
ठाणे पोलिसांनी हस्तगत केला ४० लाखांचा शस्त्रसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 03:57 IST