ठाणे - उल्हास नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनाकरीता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याने स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून १५ जून पर्यंत होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहणार आहे. या कालावधीत ठाणे शहर पाचपाखाडी, चरई, नौपाडा, सिध्देश्वर, उथळसर, महागिरी, वृदांवन, श्रीरंग, ऋुतुपार्क, कळवा, खारेगांव, रेतीबंदर व मुंब्य्रातील काही भागांचा पाणीपुरवठा १४ मे २०१४ पासून प्रत्येक बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने होणार असून, नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे,असे आवाहन पाणीपुरवठा विभागा केले आहे.
दर बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद
By admin | Updated: May 12, 2014 22:57 IST