Join us  

डेंग्यूची चाचणी करा १५ मिनिटांत!घरगुती वापरासाठीचेही कीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 2:21 AM

पुण्यासह संपूर्ण देशात थैमान घालत असलेल्या डेंग्यूच्या आजाराचे निदान केवळ १५ मिनिटांत करणे शक्य असणारे ‘डेंग्यू डे वन टेस्ट किट’ डॉ. नवीन खन्ना यांनी तयार केले आहे.

पुणे : पुण्यासह संपूर्ण देशात थैमान घालत असलेल्या डेंग्यूच्या आजाराचे निदान केवळ १५ मिनिटांत करणे शक्य असणारे ‘डेंग्यू डे वन टेस्ट किट’ डॉ. नवीन खन्ना यांनी तयार केले आहे. त्याचबरोबर लहान मुलांचे निदान करता येणारे, घरीच वापरता येऊ शकणारे कीटही बनविले असून लवकरच डेंगीप्रतिबंधक लस आणि औषधे बाजारात येणार आहे.डॉ. नवीन खन्ना यांना शुक्रवारी पुण्यात ‘अंजनी माशेलकर इन्क्ल्यूजिव्ह इनोव्हेशन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने त्यांनी ‘लोकमत’शी खास संवाद साधला.डॉ. खन्ना म्हणाले, ‘‘डेंग्यूच्या उपचारासाठी लवकरात लवकर निदान होणे आवश्यक असते. त्यादृष्टीने ही टेस्ट तयार केली आहे. अ‍ॅँटीजेन आणि अ‍ॅँटीबॉडी या दोन्ही प्रकारच्या टेस्ट या किटद्वारे होऊ शकतात. यापूर्वीअमेरिका, आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियातून येणारी कीट देशात वापरली जायची. परंतु, त्याची किंमत जास्त असल्याने हे नवीन कीट तयार केले आहे. डेंग्यू चार प्रकारच्या विषाणुंमुळे होतो. त्यामुळे एकदा तो झाल्यावर पुन्हादेखील उद्भवू शकतो. दुसºयांदा झालेला डेंग्यू जास्त अपायकारक असतो. या टेस्टमध्ये रुग्णाच्या डेंग्यूचा इतिहासच समजतो त्यामुळे उपचार करणे सुलभ होते. लहान मुलांसाठी घरीच चाचणी करता येऊ शकेल, अशी ‘डेंग्यू फिंकर प्रिक’ नावाच्या कीटमध्ये ग्लुकोमीटरप्रमाणे ही चाचणी करता येते. त्यासाठी स्ट्रिपवर रुग्णाचे दोन थेंब रक्त टाकावे लागते.’’डेंगीची तपासणीची कीट पूर्वी आयात व्हायची. परंतु, भारतामध्ये डेंगीचे प्रमाण खूप जास्त आहे. २०१३ मध्ये कीट कमी पडल्यानंतर मी विकसित केलेल्या या कीटचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला.शासनाकडूनही त्याची खरेदी सुरू झाली. त्याची किंमतही कमी असल्याने आता परदेशी कीट वापरलीच जात नसल्याचे डॉ. खन्ना यांनी सांगितले.

टॅग्स :डेंग्यू