वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर अखेर तणाव निवळला; पोलिसांना ‘मुंबई शाहीन बाग’ येथे जाण्यास मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 01:18 AM2020-03-08T01:18:30+5:302020-03-08T01:19:01+5:30

नागपाडा येथील महिलांचे आंदोलन महिनाभरापासून मॉडर्न रोड परिसरात सुरू आहे. गुरुवारी वरिष्ठ निरीक्षक शर्मा यांनी तेथे जाऊन पोलीस बळाचा वापर केला

Tensions finally subsided after the mediation of the seniors; Police should not go to 'Mumbai Shaheen Bagh' | वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर अखेर तणाव निवळला; पोलिसांना ‘मुंबई शाहीन बाग’ येथे जाण्यास मज्जाव

वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर अखेर तणाव निवळला; पोलिसांना ‘मुंबई शाहीन बाग’ येथे जाण्यास मज्जाव

googlenewsNext

मुंबई : सीएए कायद्याविरोधात नागपाडा येथील शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनातील महिलांना मारहाण करणाऱ्या नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक शालिनी शर्मा यांची चौकशी केली जाईल. त्याचा अहवाल येईपर्यंत त्यांना आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याबाबत शुक्रवारी रात्री लेखी हमी दिल्यानंतर महिला आंदोलकांनी रास्तारोको मागे घेतले. सुमारे सात तास सुरू असलेल्या रास्तारोकोमध्ये परिसरातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे परिसरात वाहतूककोंडी झाली होती.
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्टÑीय नागरिकत्व नोंदणी (एनसीआर), राष्टÑीय जनगणना नोंदणी (एनपीआर)च्या विरोधात दिल्लीत दोन महिन्यांपासून शाहीन बाग येथे महिलांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देत नागपाड्यातही आंदोलन सुरू आहे.

प्लास्टीक छत हटविण्यावरून वाद
नागपाडा येथील महिलांचे आंदोलन महिनाभरापासून मॉडर्न रोड परिसरात सुरू आहे. गुरुवारी वरिष्ठ निरीक्षक शर्मा यांनी तेथे जाऊन पोलीस बळाचा वापर केला. आंदोलनाच्या बाजूला बांधलेले प्लास्टीक छत जबरदस्तीने हटविले. त्याला विरोध करणाºया काही महिलांना मारहाण करण्यात आली. याच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारनंतर महिलांनी नागपाडा जंक्शन येथे रास्तारोको केले. अखेर वरिष्ठ अधिकाºयांनी शर्मा यांच्या चौकशी करण्याचे तसेच त्यांना यापुढे आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात आल्याची लेखी हमी आंदोलकांना दिली. त्यानंतर, रास्तारोको मागे घेण्यात आला.

Web Title: Tensions finally subsided after the mediation of the seniors; Police should not go to 'Mumbai Shaheen Bagh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.