Join us

दूरध्वनी सेवा ठप्प; ग्राहक संतप्त

By admin | Updated: February 9, 2015 22:38 IST

शहरातील दूरध्वनी कार्यालयातील सेवा तांत्रिक कारणाने वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे संपर्क साधण्याचे महत्त्वाचे साधन म्हणून वापरात असलेले दूरध्वनी बंद पडल्याने ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

रेवदंडा : शहरातील दूरध्वनी कार्यालयातील सेवा तांत्रिक कारणाने वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे संपर्क साधण्याचे महत्त्वाचे साधन म्हणून वापरात असलेले दूरध्वनी बंद पडल्याने ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.गेल्या महिनाभरातून तीनदा शहरातील दूरध्वनी सेवा खंडित झाली. आता तर तब्बल ४० तास दूरध्वनी सेवा उपलब्ध नसल्याने व्यापारीवर्गाची चांगलीच गैरसोय होत आहे. अनेक ग्राहकांनी आपली सेवा बदलून घेतली आहे. दूरध्वनी सेवा खंडित झाल्याबाबत दूरध्वनी केंद्रात विचारणा केली असता, नेहमीच उडवाउडवीची उत्तरे संंबंधित कर्मचाऱ्यांकडून देण्यात येतात.