Join us  

‘तेजस’ होणार अत्याधुनिक, एचएएलची तयारी, स्वयंचलित रडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:58 PM

अत्याधुनिक ‘तेजस’ लढाऊ विमानाच्या निर्मितीसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) तयारी सुरू केली आहे. स्वयंचलित रडार, दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्र डागण्याची क्षमता, हवेतून इंधन भरणे अशा प्रणालींनी हे स्वदेशी विमान सज्ज असेल.

मुंबई : अत्याधुनिक ‘तेजस’ लढाऊ विमानाच्या निर्मितीसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) तयारी सुरू केली आहे. स्वयंचलित रडार, दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्र डागण्याची क्षमता, हवेतून इंधन भरणे अशा प्रणालींनी हे स्वदेशी विमान सज्ज असेल.नवरत्न कंपनीचा दर्जाच्या संरक्षण मंत्रालयाच्या एचएएल कंपनीने आगामी काळात मोठ्या योजना आखल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाने ८२ हजार कोटी रुपयांच्या साधन सामग्रीच्या खरेदीचे नियोजन केले आहे. पैकी ६८,५०० कोटींची खरेदी एचएएलकडून होणार आहे, यासाठी कंपनी शेअर्सद्वारे बाजारातून निधी उभा करीत आहे. ‘लाइट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट’ अर्थात, ‘एलसीए तेजस’ या लढाऊ विमानाची एक तुकडी एचएएलने हवाईदलाच्या सुपुर्द केली आहे. मात्र, हवाई दलाला आणखी अत्याधुनिक विमानांची गरज आहे. त्यासाठीच ‘एलसीए मार्क१ए’ विमानावर एचएएल काम करीत आहे.हवाई दलाच्या ताफ्यात एकही लढाऊ हेलिकॉप्टर नाही. स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टरची नितांत गरज आहे. अशा हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरची समुद्र सपाटीपासून ५,४०० मीटर उंचीवरील (सुमारे १८ हजार फूट) सियाचीन येथे यशस्वी चाचणी घेतली आहे. चेतक व चिता हेलिकॉप्टर्स जुनी झाल्याने, हवाईदलाला हलक्या वाहतूक हेलिकॉप्टरची गरज आहे. त्यासाठीही एचएएलने ६,५०० मीटर उंचीपर्यंत ताशी २२० किमी वेगाने ३५० किमीपर्यंत उडू शकणाऱ्या हेलिकॉप्टरची निर्मिती सुरू केली आहे. सन २०१५ ते २०१७ एचएएलच्या महसुलात ९ टक्के तर निव्वळ नफ्यात ६२ टक्के वाढ झाली आहे.एचएएलचे उपक्रम- पुढील पिढीतील तेजस लढाऊ विमान- हलक्या वाहतुकीचे ‘डॉर्निअर२२८’ विमान- प्रारंभीच्या प्रशिक्षणासाठी ‘एचटीटी४०’ विमान- नौदलासाठी हलके ध्रुव हेलिकॉप्टर- छोट्या व मध्यम इंजिनांची निर्मिती

टॅग्स :मुंबई