Join us

टल्ली रिक्षाचालकाचा प्रताप ! रिक्षा चक्क प्लॅटफॉर्मवर

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST

वेस्टर्न....

वेस्टर्न....
टल्ली रिक्षाचालकाचा प्रताप ! रिक्षा चक्क प्लॅटफॉर्मवर

मुंबई: दहशतवादी हल्ल्यानंतर शहरातील प्रमुख रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. मात्र, आजही रेल्वे स्थानकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना रविवारी रात्री पश्चिम रेल्वेच्या कांदिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र मांक एकवर घडली. एका दारुड्या रिक्षाचालकाने दारूच्या नशेत रिक्षा चक्क प्लॅटफॉर्म नेली. हा प्रकार आरपीएफच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी रिक्षाचालकाला लगेचच गजाआड केले.
प्रवीण राय असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तो कांदिवली पूर्व येथे राहतो. रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कांदिवली फाटकातून प्रवीणने रिक्षा थेट प्लॅटफॉर्मवर नेली. विशेष म्हणजे रविवार असल्याने प्लॅटफॉर्मवर फारशी गर्दी नव्हती. त्या रिक्षा चालकाने काही मिनिट रिक्षा प्लॅटफॉर्मवर चालवली देखील. ही बाब एका प्रवाशाने आरपीएफच्या निदर्शनास आणून दिली. आरपीएफच्या जवानांनी प्रवीणला ताब्यात घेऊन अटक केली. त्याची वैद्यकीय चाचणी केली असता, त्याच्या रक्तात दारूचे अंश आढळल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते. त्याला सोमवारी अंधेरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी बोरिवली आरपीएफ ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.