Join us  

बोगीत तिकीट घ्या; पण एसी लोकलमध्ये या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 5:27 AM

पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलला अद्यापही प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद लाभलेला नाही. वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी पश्चिम रेल्वे एसी लोकलमधील तिकीट तपासनिसांना तिकीट मशीन उपलब्ध करून देणार आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलला अद्यापही प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद लाभलेला नाही. वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी पश्चिम रेल्वे एसी लोकलमधील तिकीट तपासनिसांना तिकीट मशीन उपलब्ध करून देणार आहे. या मशीनमुळे मासिक पासधारकांना तिकीट फरकाचे पैसे देत बोगीत तिकीट मिळणार आहे. सध्या पासधारकांना तिकीट खिडकीवरून एसीचे अतिरिक्त तिकीट काढावे लागत आहे.प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा यासाठी प्रथम दर्जा आणि मासिक पासधारक प्रवाशांना वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला. प्रथम दर्जाचे तिकीट व पासधारकांना वातानुकूलित तिकीट व पास यांमधील फरकाचे पैसे भरून प्रवास करावा, अशी मुभा प्रवाशांना देण्यात आली. तरीदेखील प्रथम दर्जाचे आणि ठरावीक प्रवासी वगळता द्वितीय दर्जाच्या प्रवाशांनी ‘न परवडणाºया’ दरामुळे एसी लोकलकडे पाठ फिरवली आहे.एसी लोकलमध्ये इलेक्ट्रिक यंत्रणा, दरवाजे बंद होण्यास विलंब आणि अन्य सॉफ्टवेअर अडचणी होत्या. मात्र, त्या दूर करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेतर्फे देण्यात आली. गतवर्षी नाताळच्या मुहूर्तावर पहिली वातानुकूलित लोकल सुरू झाली. एसी लोकलच्या वेळापत्रकामुळेच ती सर्वप्रथम चर्चेत आली. सर्वसामान्य लोकल फेºया रद्द करून वातानुकूलित लोकल धावली. एसी लोकलचे दर प्रथम दर्जापेक्षा जास्त आहेत.परिणामी सर्वसामान्य प्रवाशांनी एसी लोकलकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली. त्यामुळेच प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास करावा यासाठी आता पश्चिम रेल्वेने नवी शक्कल लढविली आहे. त्यानुसार एसी लोकलचे तिकीट बोगीत देण्यात येणार आहे.>पुढील आठवड्यात मशीन मिळणारतिकीट मशीनसाठी रेल्वे सूचना प्रणाली केंद्रासोबत (क्रिस) करार करण्यात आला आहे. हातात वापरण्यात येणाºया तिकीट मशीनची चाचणी यशस्वी झालेली आहे.पुढील आठवड्यात या मशीन उपलब्ध होतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्तायांनी दिली.

टॅग्स :एसी लोकल