Join us  

मुंबईत लखलखणार सिंथेटिक हिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 6:21 AM

कलर, कॅरेट, क्लॅरेटी आणि कट या चार ‘सी’च्या आधारेही जेथे खऱ्या हि-यांची पारख अजूनही अनेक ग्राहक करू शकत नाहीत, अशा वातावरणात मुंबईच्या बाजारपेठेत सिंथेटिक (मानव निर्मित) हिरे मोठ्या प्रमाणात विक्रीला येणार आहेत.

मुंबई - कलर, कॅरेट, क्लॅरेटी आणि कट या चार ‘सी’च्या आधारेही जेथे खऱ्या हि-यांची पारख अजूनही अनेक ग्राहक करू शकत नाहीत, अशा वातावरणात मुंबईच्या बाजारपेठेत सिंथेटिक (मानव निर्मित) हिरे मोठ्या प्रमाणात विक्रीला येणार आहेत. त्यामुळे नेहमी झळाळून निघणा-या या बाजारपेठेत सध्या वादाची चकमक झडू लागली असून, पारंपरिक व्यापा-यांनी अशा हिरेविक्रीला कडाडून विरोध सुरू केला आहे. हिरा सिंथेटिक आहे, याची कल्पना जर दिली गेली नाही, तर ग्राहकांची फसवणूक होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.हिरे व्यापारातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठा ब्रॅँड असलेल्या व १३० वर्षांपासून हिरे व्यापारात कार्यरत असलेल्या ‘डी बियर्स’ या कंपनीने या हिºयांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी याच कंपनीचे अशा कृत्रिम हिºयांच्या विक्रीला जोरदार विरोध केला होता.मुंबईसह देशातील हिरे बाजारातील या सिंथेटिक हिºयांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या ‘एन्ट्री’मुळे पारंपरिक हिरे व्यापारी अस्वस्थ झाले आहेत. सध्या अशा हिºयांची विक्री सुरू आहे; पण अगदी मोजके व्यापारी सिंथेटिक हिºयांची विक्री करतात. ते प्रमाण नगण्य असल्याने आजवर सिंथेटिक हिºयांच्या व्यापाराबद्दल फारशी माहिती नव्हती. मात्र, ‘डी बियर्स’ने या क्षेत्रात पदार्पण केल्याने हिºयांची बाजारपेठच बदलून जाणार आहे. जगभरातील खाणीतून काढलेल्या हिºयांना पैलू न पाडता ते कच्चा माल म्हणून विकण्याचे काम ‘डी बियर्स’ कंपनी करते. या बाजारपेठेतील त्यांचा हिस्सा तब्बल २७ टक्के आहे. आता, तीच कंपनी सिंथेटिक हिºयांची विक्री करणार असल्याने त्याचा फटका पारंपरिक हिरे व्यापाराला बसणार हे निश्चित असल्याचे हिरे व्यापारातील तज्ज्ञ हार्दिक हुंडिया यांनी म्हटले आहे. खासकरून देशातील हिरे व्यापारासाठी ही धोक्याची घंटा असल्याचा इशाराही त्यांनी दिला.खरे हिरे व कृत्रिम हिºयाची सरमिसळ होण्याची आणि हिरे व्यापाºयांवर अवलंबून असलेल्या कारागिरांवर रोजगार गमवण्याची वेळ येण्याची भीती त्यांच्यासह अभ्यासक वर्तवत आहेत.किंमत ६० टक्के कमीसिंथेटिक हिºयांची किंमत खºया हिºयांपेक्षा ६० टक्क्यांहूनही कमी असते. अनेकदा हिºयांचा जो दर्जा असेल त्यापेक्षा अधिक दाखवून चढ्या भावानेही त्याची विक्री केल्याचे प्रकार घडतात. गीतांजली ग्रुप या हिरे व सोने व्यापारातील मोठ्या कंपनीने हिºयांचा खोटा दर्जा दाखवून वाढीव किमतीने हिºयांची विक्री केल्याचे प्र्रकरण नीरव मोदी प्रकरणात नुकतेच समोर आले होते.‘ट्रेंडवर परिणाम होईल’सिंथेटिक हिºयांची विक्री सुरू झाली तर हा धोका वाढीस लागण्याची भीती त्यामुळे निर्माण झाली आहे. सिंथेटिक हिरे बाजारात येऊ लागले तर हिºयांच्या बाजारपेठेचा किमतीचा तोरा कमी होईल. दागिन्यांसाठीच नव्हे, तर गुंतवणूक म्हणून हिºयांची खरेदी करण्याच्या ट्रेंडवर परिणाम होईल, अशी भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.सिंथेटिक हिºयांना पैलू पाडण्यासह सर्व प्रक्रिया परदेशात होतात. त्यामुळे देशातील हिरे व्यापारातील तंत्रज्ञ, कारागीर रस्त्यावर येतील, अशी भीतीही व्यक्त होते आहे. व्यापाºयांनी सिंथेटिक हिºयांची विक्री करताना ते हिरे सिंथेटिक असल्याचे सांगितले तर ठीक, अन्यथा ग्राहकांची फसवणूक होईल, अशी शक्यता हुंडिया यांनी वर्तवली. ‘डी बियर्स‘ने या क्षेत्रात पाऊल टाकताच अन्य कंपन्याही या बाजारपेठेत उतरण्याच्या तयारीत आहेत. ‘द जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’ने याबाबत १२ जूनला चर्चासत्र ठेवले आहे. त्यात पुढील धोरण ठरेल.

टॅग्स :मुंबईबाजार