Join us

वडाळा स्थानकात भरदिवसा चेन स्नॅचिंग

By admin | Updated: August 23, 2014 12:12 IST

वडाळा स्थानकात भरदिवसा एका भुरट्या चोराने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरत पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३ -  मुंबईत महिला अद्यापही सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. वडाळा स्थानकात भरदिवसा एका भुरट्या चोराने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरत पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही महिला ट्रेनची वाट पहात असताना एक तरूण तेथे चालत आला आणि डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच त्याने त्या महिलेच्या गळ्यातील चेन खेचत प्लॅटफॉर्मवरून उडी मारली.  स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली असून पुढील तपास सुरू आहे.