Join us  

वर्षभरात स्वाइन फ्लूचे राज्यभरात २४० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 5:28 AM

यंदा नोव्हेंबर महिना उजाडला, तरीही शहर उपनगरात पाऊस सुरू आहे.

मुंबई : यंदा नोव्हेंबर महिना उजाडला, तरीही शहर उपनगरात पाऊस सुरू आहे. या बदलत्या वातावरणामुळे आजारांचा विळखा वाढतो आहे. त्याचप्रमाणे, स्वाइन फ्लूचे प्रमाणही कमी झालेले नाही. यंदाच्या वर्षभरात राज्यात स्वाइन फ्लूचे तब्बल २४० बळी गेले आहेत. यात नाशिकमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३४ बळींची नोंद झाली आहे, तर बाधित रुग्णांची संख्या राज्यात २ हजार २७१ आहे.राज्यभरात जानेवारीपासून २७ लाख १५ हजार २७१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात अ‍ॅसिलटॅमिवीर या गोळ्या दिलेल्या संशयित फ्लू रुग्णांची संख्या ४१ हजार ९८३ इतकी आहे, तर राज्यात सध्या रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांची संख्या २७ आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यानंतर नागपूरमध्ये २८, अहमदनगरमध्ये २२, पुणे मनपा १९, कोल्हापूरमध्ये १६ आणि ठाणे, कल्याण येथे अनुक्रमे ११, १० अशी बळींची नोंद करण्यात आली आहे. मुंबई शहर उपनगरात स्वाइन फ्लूमुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यात स्थलांतरित रुग्णांचाही समावेश आहे.राज्य शासनाच्या वतीने अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत इन्फ्ल्यूएंझा लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या दुसऱ्या व तिसºया तिमाहीतील गरोदर महिलांसोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब असणाºया आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. २०१५-१६मध्ये १ लाख १ हजार ३५६ व्यक्तींना, २०१६-१७ मध्ये ४२ हजार ४९२ व्यक्तींना ही लस देण्यात आली. जानेवारी ते ३० जून, २०१८ अखेर १ लाख २८ हजार २६ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. याखेरीज, जानेवारी, २०१९ ते नोव्हेंबर या कालावधीत ६० हजार १९९ व्यक्तींना लसीकरण देण्यात आले.>राज्याची स्वाइन फ्लूची आकडेवारीवर्ष रुग्णसंख्या मृत्यूसंख्या२०१५ ८ हजार ५८३ ९०५२०१६ ८२ २६२०१७ ६ हजार १४४ ७७८२०१८ २ हजार ५९३ ४६१२०१९ २ हजार २७१ २४० (नोव्हेंबरपर्यंत)

टॅग्स :स्वाईन फ्लू