Sushant Singh Rajput Case: एनसीबी अ‍ॅक्शन मोडमध्ये; शोविकच्या चौकशीनंतर मुंबईत मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 05:09 PM2020-09-06T17:09:35+5:302020-09-06T17:13:58+5:30

Sushant Singh Rajput Case: वांद्रे-सांताक्रूझ परिसरात एनसीबीच्या पथकाचे छापे

Sushant Singh Rajput Case NCB carried outs raids at several places in Mumbai | Sushant Singh Rajput Case: एनसीबी अ‍ॅक्शन मोडमध्ये; शोविकच्या चौकशीनंतर मुंबईत मोठी कारवाई

Sushant Singh Rajput Case: एनसीबी अ‍ॅक्शन मोडमध्ये; शोविकच्या चौकशीनंतर मुंबईत मोठी कारवाई

Next

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी विभागानं (एनसीबी) मोठी कारवाई सुरू केली आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला अटक केल्यानंतर आता एनसीबीनं मुंबईत छापा सत्र सुरू केलं आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या चौकशीत अनेक अंमली पदार्थ विक्रेत्यांची नावं समोर आल्यानंतर एनसीबीनं छापे टाकण्यास सुरुवात केली. एनसीबीचं पथक सध्या वांद्रे-सांताक्रूझमध्ये धाडी टाकत आहे. 

प्रेम करणे गुन्हा असेल तर...;रिया चक्रवर्तीच्या वकीलांचे ‘इमोशनल कार्ड’

रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकनं त्याच्या चौकशीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या काही जणांची नावं सांगितली होती. त्यानंतर एनसीबीनं वांद्रे-सांताक्रूझ परिसरात छापे टाकत त्यांची धरपकड सुरू केली आहे. यातील काहींची नावं एनसीबीला शोविकच्या मोबाईल चॅटमधूनही मिळाली आहेत. याआधारे एनसीबीनं कारवाई सुरू केली आहे.

रियाच्या इशा-यावर घरी यायचे ड्रग्ज, सुशांतचा स्टाफ दीपेशने दिली कबुली!!

शुक्रवारपासून एनसीबीच्या कारवाईला वेग आला आहे. अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबीच्या पथकानं रियासह अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या काहींच्या घरांवर छापे टाकले. या प्रकरणी एनसीबीनं रियाचा भाऊ शोविकसह अन्य सात जणांना अटक केली. यामध्ये सॅम्युअल, करण, कैजान, दीपेश आणि जैद यांचा समावेश आहे. यापैकी एनडीपीएस कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत दीपेशचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर त्याला याच कलमांतर्गत अटक करण्यात आली.

"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सध्या एनसीबीचं पथक रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे. चौकशीनंतर तिला अटक होण्याची शक्यता आहे. अंमली पदार्थ खरेदी प्रकरणात शोविक आणि सॅम्युअलला काल न्यायालयानं ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या कैजानला मात्र जामीन मिळाला. यानंतर आता दीपेशलादेखील न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. दीपेशलाही कोठडी सुनावण्याची मागणी एनसीबीकडून केली जाणार आहे. शौविक, मिरांडा आणि दीपेशला रियासमोर बसवून एनसीबी चौकशी करू शकते.

Web Title: Sushant Singh Rajput Case NCB carried outs raids at several places in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.