Sushant Singh Rajput Case: सीबीआयही म्हणते सुशांतसिंहने आत्महत्याच केली, एम्सला दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 03:10 AM2020-10-08T03:10:49+5:302020-10-08T07:31:56+5:30

Sushant Singh Rajput Case: एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनीही सुशांतसिंहने आत्महत्याच केली असल्याचे आपल्या अहवालात म्हटले होते.

Sushant Singh Rajput case CBI says after aiims report cbi also says Sushant Singh committed suicide | Sushant Singh Rajput Case: सीबीआयही म्हणते सुशांतसिंहने आत्महत्याच केली, एम्सला दुजोरा

Sushant Singh Rajput Case: सीबीआयही म्हणते सुशांतसिंहने आत्महत्याच केली, एम्सला दुजोरा

Next

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली, असा निष्कर्ष सीबीआयने या प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासातून काढला आहे. एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनीही सुशांतसिंहने आत्महत्याच केली असल्याचे आपल्या अहवालात म्हटले होते.

सुशांतसिंह मरण पावला त्यावेळचा सारा घटनाक्रम सीबीआयने पुन्हा तपासून पाहिला होता. तसेच या अभिनेत्याच्या बँक खात्यातून जे व्यवहार झाले त्यात संशयास्पद असे काहीही सीबीआयला सापडलेले नाही. त्यामुळे रिया चक्रवतीर्ने स्वत:च्या आर्थिक लाभासाठी अशी काही कृत्ये केली की ज्यामुळे सुशांतसिंहला आत्महत्या करणे भाग पडले असा जो संशय व्यक्त करण्यात येत होता तो निरर्थक असल्याचे सीबीआयच्या आजवरच्या तपासातून सिद्ध झाले आहे.

त्यामुळे सुशांतसिंहने आत्महत्या करण्यामागचे आणखी नेमकी कारणे काय असावीत याचा शोध आता सीबीआय घेत असल्याचे या तपासयंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले. रिया चक्रवर्तीकडून आणखी काही गैरकृत्ये झाली होती का किंवा व्यावसायिक शत्रूत्वाला कंटाळून सुशांतसिंहने आत्महत्या केली का? या गोष्टींचा शोध आता सीबीआय तपासादरम्यान घेत आहे.

गेल्या पाच वर्षांत सुशांतसिंह राजपूत याच्या बँक खात्यातून ७० कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्यातील फक्त ५५ लाख रुपयांच्या व्यवहारांशी रिया चक्रवतीर्चा संबंध आला आहे. त्यातील सर्वाधिक रक्कम भेटवस्तू देणे, स्पामध्ये जाणे किंवा प्रवासावर खर्च झाली आहे.


सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, रिया चक्रवर्तीमुळेच सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली असावी असा सीबीआयला संशय होता. मात्र तसा कोणताही पुरावा सीबाआयला अद्याप मिळालेला नाही. सुशांतसिंह याच्या बँक खात्यातून रिया चक्रवतीर्ने पैसे लांबविल्याचा कोणताही पुरावा सीबीआयला मिळालेला नाही. रियावर सुशांतसिंहने खर्च केलेल्या पैशाचा हिशेब व्यवस्थितपणे मिळू शकतो.

मृत्यू प्रकरणाला अनेक पदर
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला अनेक पदर आहेत व त्याचा विचार करूनच आम्ही याप्रकरणी पुढील तपास करीत आहोत, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. सुशांतसिंहच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपये परस्पर काढण्यात आले असून, रियानेच हे कृत्य केले असल्याचा आरोप या अभिनेत्याचे वडील के. के. सिंह यांनी केला होता.

Web Title: Sushant Singh Rajput case CBI says after aiims report cbi also says Sushant Singh committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.