Join us  

सर्वांगसुंदर मुंबईसाठी कटिबद्ध - महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 5:37 AM

महापालिका मुंबईकरिता नागरी सुविधा देण्यासाठी नियोजन करत असून, वेळोवेळी या नागरी सुविधांचे अत्याधुनिकीकरण करण्यात येते.

मुंबई : महापालिका मुंबईकरिता नागरी सुविधा देण्यासाठी नियोजन करत असून, वेळोवेळी या नागरी सुविधांचे अत्याधुनिकीकरण करण्यात येते. मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता, दैनंदिन कचºयाची विल्हेवाट, पाणीपुरवठा आणि आरोग्यसेवा या मूलभूत सुविधांव्यतिरिक्त, मुंबईचा आंतरराष्ट्रीय दर्जा अबाधित राहावा याकरिता विकासाची कामे व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भविष्यकालीन योजना आखत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्वातंत्र्य दिनी महापालिका मुख्यालयात केले.महाडेश्वर म्हणाले की, कुलाबा मलजल प्रकल्प, चिंचपोकळी उदंचन केंद्रांची दर्जोन्नती व वल्लभनगर उदंचन केंद्राच्या दर्जोन्नतीचे काम आगामी वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. ज्यायोगे, मुंबई शहरामध्ये निर्माण होणाºया मलजलावर योग्य पद्धतीने प्रक्रिया करता येईल. कचºयापासून ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पासाठी पर्यावरणविषयक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, आवश्यक त्या परवानग्या मिळविण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. करदात्यांना वेळेत कर भरण्यास प्रोत्साहन देण्याकरिता सुरू करण्यात आलेली अर्ली बर्ड योजना सुरू राहणार आहे. अग्निशमन दल अद्ययावत सुविधायुक्त असावे यादृष्टीने ‘एस.ओ.पी.’ ही अद्ययावत कार्यपद्धती तयार केली असून, मुंबईमध्ये २६ नवीन अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहेत.पालिकेच्या १२०० शाळांमध्ये माहिती व तंत्रज्ञान सेवेत वाढ होण्याच्या दृष्टीने इंटरनेट कनेक्शनसह एलसीडी प्रोजेक्टर्स पुरविण्यात येणार आहेत. प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवलीपर्यंत अंदाजे एकूण २९.२०७ किलोमीटर्स लांबीच्या सागरी किनारा मार्गाचे काम मंजूर करण्यात आले असून, या कामास लवकरच सुरुवात होईल, असेही महाडेश्वर यांनी सांगितले.