Join us  

आमदार निवासाला टेकूचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 6:38 AM

नरिमन पॉइंट परिसरातील मनोरा आमदार निवासाच्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत असून लोखंडी खांबांचे ‘टेकू’

गणेश देशमुख मुंबई : नरिमन पॉइंट परिसरातील मनोरा आमदार निवासाच्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत असून लोखंडी खांबांचे ‘टेकू’ लावून स्लॅब तात्पुरता रोखून धरण्यात आला आहे. या इमारतीत आजही आमदारांचे वास्तव्य असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.मनोरा आमदार निवास इमारतीतील काँक्रीटमधील लोखंड गंजल्यामुळे इमारती ढासळण्याच्या स्थितीत आहेत. एकूण चार इमारतींपैकी ‘ड’ इमारतीचा स्लॅब काही दिवसांपूर्वी अंशत: ढासळला. मात्र, आमदार सतीश पाटील हे कक्षात नसल्याने ते थोडक्यात बचावले. त्यानंतर मनोरा राहण्यायोग्य नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत दाखल होणाऱ्या अनेक आमदारांचे वास्तव्य मनोरा इमारतीत आहे. राज्यभरातून येणारे शेकडो कार्यकर्तेही आमदार निवासात वास्तव्यास असतात. इमारतीच्या व्हरांड्यातही आगंतुक दाटीवाटीने झोपतात. जुन्या घटनेची पुनरावृत्ती झालीच तर एकाच वेळी शेकडो जीव धोक्यात येतील. त्यामुळे तात्पुरती डागडुजी न करता ‘मनोरा’ तत्काळ खाली करणे आवश्यक असल्याचे बांधकाम विभागातील अधिकाºयांचे म्हणणे आहे.