Join us

सूर्या प्रकल्प अजूनही अपूर्णच

By admin | Updated: September 17, 2014 22:24 IST

गावांना कालव्याअंतर्गत श्ेातीला पाणीपुरवठा करून हरितक्रांती करण्याच्रूा हेतूने 34 वर्षापूर्वी धामणी येथे सन 1972 साली सुर्या नदीवर धरण बांधण्यात आले.

कासा : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील डहाणू पालघर विक्रमगड तालुक्यातील गावांना कालव्याअंतर्गत श्ेातीला पाणीपुरवठा करून हरितक्रांती करण्याच्रूा हेतूने 34 वर्षापूर्वी धामणी येथे सन 1972 साली सुर्या नदीवर धरण बांधण्यात आले. मात्र 34 वर्षानंतरही अद्याप सूर्या प्रकल्प अपूर्णवस्थेत असून पालघर तालुक्यातील हजारो शेतकरी सूर्या धरणाची पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
सिंचन हा प्रमुख उद्देशाने सदर धरण उभारण्यात आले. धरणाअंतर्गत सुमारे 15 हजार हेक्टर शेती सिंचनाखली आणण्यात आली. या धरणासाठी विक्रमगड तालुक्यातील सावा, तिलोंडा, धरमपूर, धामणी, तलवाडा, कवडोस आदी गावांतील 45क् कुटुबाचे विस्थापन करण्यात आले व सदर कुटुंबे डहाणू तालुक्यातील हनुमाननगर व चंद्रनगर येथे पुनवर्सीत करण्यात आली आहे. सूर्याप्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यासाठी शेतक:यांच्या जमिनी संपादीत करून सुमारे 1क्क् गावांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मात्र अद्याप 3क् ते 35 गावांना कालव्यांचे काम अपूर्ण राहिल्याने शेतीला पाणी मिळालेला नाही.
पालघर तालुक्यातील किराट, लालोंडे, चरीनिहे, वेळगांव नासरी, दोमखिंड, गुंदले करवेले, पांढरे गरवाशेत, गिरनोली आदी गावांमध्ये वनजमिनीच्या अडथळ्यांमुळे 34 वर्षापासून कालव्यांची कामे अपूर्ण अवसेित आहेत. दरम्यान वनजमिनी व्यतिरिक्त जलसंपदा विभागाने संपादीत करून कालवे काढून  कच्चे माती भरावाचे कालवे पाणी  पुरवठा होत नसताना ब:याच वेळा  अधिका:यांनी आपल्या मनमानीपणो कालव्याची दुरूस्तीची  कामेही 1क् वर्षापूर्वी  करण्यात आली. कालव्याच्या पण्याच्या पुरवठय़ाचा पत्ता नाही कालव्याच्या कामे अपूर्ण  मात्र तरीही  काही कालवे पक्के करण्यात आले आता तर  सदर कालव्याची गवत, माती साचून दूरवस्था झाली आहे. शेतक:यांनी कालव्यासाठी जमिनी देवूनही केवळ कालव्यांच्या कामात मार्गात वनजमिनींची अडचण जलसंपदा विभागाला दूर न करता आल्याने सदर गावातील शेतक:यांना तब्बल 34 वर्षानंतरही शेतीसाठी सूया्र कालव्याच्या पाण्याची प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पालघर तालुक्यातील सदर गावातील शेतात उभारलेलीे कालवे हे  केवळ देखावेच ठरले आहेत.
सूर्या प्रकल्प अपूर्णावस्थेत असताना 1क् वर्षापूर्वी कालव्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे कारण पुढे करतात. सदर प्रकल्प शेतक:यांच्या अडीअडचणीच विचार न करता जलसंपदा विभागाने सूर्याप्रकल्पाची सर्व कार्यालये बंद करून शहापूर तालुक्यातील भातसा कालव्याला जोडण्यात आला त्यामुळे कालव्यांची दुरूस्ती शेतक:यांच्या अडीअडचणीसाठी  1क्क् ते 12क् कि.मी. शहापूरला जाणो शक्य होत नाही. त्यामुळे प्रकल्प अपूर्ण असताना विस्थापित असून शेतक:यांवर अन्यायझाल्याने नाराजी व्यक्त करीत आहे. (वार्ताहर)
 
शेतकरी अडचणीत
सदर प्रकल्प शेतक:यांच्या अडीअडचणीच विचार न करता जलसंपदा विभागाने सूर्याप्रकल्पाची सर्व कार्यालये बंद करून शहापूर तालुक्यातील भातसा कालव्याला जोडण्यात आल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.