Join us  

उन्हाचे चटके एसी लोकलच्या पथ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 4:49 AM

उत्पन्न वाढले : लाखोंची वातानुकूलित लोकल झाली कोट्यधीश; प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ

महेश चेमटे ।मुंबई : रणरणते ऊन आणि वाहतूककोंडी, यातून सुटका करणारी गारेगार लाइफलाइन म्हणून वातानुकूलित लोकलकडे प्रवाशांचा कल वाढत आहे. यामुळे सुरुवातीला लाखो रुपये उत्पन्न देणाऱ्या वातानुकूलित लोकलने मार्च अखेरीस १ कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे. वाढत्या तापमानामुळे प्रवाशांना बसणारे चटके एसी लोकलच्या पथ्यावर पडत असून, एसी लोकलमध्ये प्रवाशांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत वाहतुकीसाठी ‘लोकल’ नेहमीच प्रथम पसंतीस उतरली आहे. मध्य रेल्वेवरील तांत्रिक बाबींमुळे वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेकडे सोपवण्यात आली. पश्चिम रेल्वेने देशातील पहिली वातानुकूलित लोकल यशस्वीपणे चालवली. वातानुकूलित लोकलचे भाडे प्रथम दर्जापेक्षा जास्त आहे. मात्र, शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची कामे, वाहतूककोंडी, ध्वनिप्रदूषण आणि मानसिक त्रास यातून एसी लोकलमुळे सुटका होत असल्याने बहुतांशी प्रवासी वातानुकूलित लोकलकडे वळल्याचा दावा पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला आहे.२५ ते २९ डिसेंबर २०१७ या कालावधीत एसी लोकलमधून ९ हजार ९ प्रवाशांनी प्रवास केला. यापैकी २०२९ प्रवासी ‘तिकीट’धारक होते, तर १४४ प्रवासी ‘पास’धारक होते. डिसेंबर २०१७मधील पाच दिवसांमधून वातानुकूलित लोकलने ४ लाख ९९ हजार ९२७ रुपये इतके उत्पन्न मिळवले. प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे मार्च २०१८पर्यंत तब्बल ७ लाख २८ हजार ५१५ प्रवाशांनी गारेगार प्रवासाचा अनुभव घेतला. परिणामी सुरुवातीला लाख रुपयांचे उत्पन्न देणाºया एसी लोकलने अल्पावधीत कोट्यवधींचा आकडा पार केला.अन्य साधनांच्या तुलनेत एसी लोकल स्वस्तपश्चिम रेल्वे सुमारे ३६ लाख प्रवाशांची रोज वाहतूक करते. चर्चगेट ते विरार हे अंतर पार करण्यासाठी एसी लोकलने सुमारे दोन तास लागतात, तर रस्ते मार्गाने तीन तासांहून अधिक वेळ लागतो. चर्चगेट ते विरार ३० दिवसांचा दैनंदिन खर्च आणि वातानुकूलित लोकल पास यांचा हिशोब केल्यास सार्वजनिक प्रवासी साधने, मेट्रो, एसी बस, खासगी वातानुकूलित वाहने यांच्या तुलनेत एसी लोकल स्वस्त असल्याचे पश्चिम रेल्वे अधिकाºयांचे म्हणणे आहे.‘सुखद नव्हे, सुरक्षित प्रवास’मुंबईसारख्या शहरात वातानुकूलित लोकल सुरू करणे एक ‘टास्क’ होते. मात्र, प्रवाशांचे अपघात रोखण्यासाठी ‘दरवाजे बंद असलेली लोकल’ उपनगरीय रेल्वेमध्ये समाविष्ट करण्याची गरज होती. दरवाजे बंद असल्याने ‘एसी’ बसवणेच व्यवहार्य होते.मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या गेल्या वर्षीच्या अपघात आकडेवारीनुसार, रेल्वे व फलाटांदरम्यान पडून २४ प्रवाशांचा मृत्यू झाला, चालत्या रेल्वेमधून पडून २०८८ प्रवाशांचा मृत्यू झाला तर रेल्वे खांबाचा धक्का लागल्यामुळे १०२ प्रवाशी मृत्युमुखी पडले.एसी लोकलचे दरवाजे बंद असल्याने या अपघातांची शक्यता ‘न’च्या तुलनेत आली आहे. ‘फटका गँग’ची भीती प्रवाशांमध्ये असते. मात्र, एसी लोकलमधून भीतीमुक्त प्रवास करणे शक्य आहे, असे एमआरव्हीसीच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :लोकल