सारांश.....३ बातम्या
By admin | Updated: August 25, 2014 22:33 IST
वरळी श्री गणेशोत्सव मंडळाचे ९० वे वर्ष
सारांश.....३ बातम्या
वरळी श्री गणेशोत्सव मंडळाचे ९० वे वर्ष मंुबई: वरळी-कोळीवाडा येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने ९० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन श्री शंकर मंदिर सभागृह, वरळी गाव येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त रविकिरण पराडकर आणि कवी सूर्यकांत मालुसरे उपस्थित असतील. ...........................................................आजी, माजी शिक्षकांचा सत्कारमंुबई - प्रतिकूल परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहिले त्या विद्यार्थ्यांना आस्था रात्रशाळा व त्यातील शिक्षकांनी मदतीचा हात दिला. त्याच कृतज्ञतेचे भान ठेवून रात्रशाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून सर्व आजी व माजी शिक्षकांचा सत्कार १३ सप्टेंबर रोजी करण्याचे ठरविले आहे. सर्व माजी विद्यार्थ्यांनी यासाठी एकत्र यावे, असे आवाहन रात्रशाळेतील माजी विद्यार्थ्यांनी केले आहे............................................................लोककलावंतांना उमेदवारी देण्याची मागणी मंुबई - महाराष्ट्रात विविध निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला यश मिळवून देण्यासाठी नामवंत कलाकारांनी काँग्रेसला साथ दिली आहे. पण लोककलावंतांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविण्यासाठी कोणताही प्रतिनिधी नाही. त्यामुळे या कलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभरातून किमान ५ नामवंत कलाकारांना उमेदवारी देण्याची मागणी प्रदेश काँगे्रस लोककलावंत सांस्कृतिक सेल अध्यक्ष व गायक विष्णू शिंदे यांनी केली आहे. .............................................................