Join us  

सुधाकर प्रभुदेसाई यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 4:53 AM

ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते सुधाकर प्रभुदेसाई यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता या समाजवादी नेत्यांनी सुरू केलेल्या जनता या इंग्रजी साप्ताहिकाचे ते अनेक वर्षे काम पाहत होते.

मुंबई : ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते सुधाकर प्रभुदेसाई यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता या समाजवादी नेत्यांनी सुरू केलेल्या जनता या इंग्रजी साप्ताहिकाचे ते अनेक वर्षे काम पाहत होते. पनवेलजवळील तारा गावात असलेल्या युसुफ मेहरअली सेंटरशीही ते संबंधित होते. आचार्य नरेंद्र देव खोज परिषदेचेही ते काम पाहत.डॉ. जी. जी. पारेख यांच्यासमवेत काम करणाऱ्या सुधाकर प्रभुदेसाई हे भाऊ पाध्ये, रघु दंडवते, नामदेव ढसाळ, मनोहर ओक, अरुण कोलटकर या मराठी बंडखोर साहित्यिकांच्या ते सतत संपर्कात असत. साप्ताहिक दिनांक, झोत हे पाक्षिक यांच्याशी त्यांचा संबंध होता. सर्व समाजवादी नेत्यांशी त्यांचा संबंध होता. ते आणीबाणीत तुरुंगातही होते. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी स्मिता गांधी आहेत.

टॅग्स :मुंबईबातम्या