मुंबई : न्यायाधीश दीनानाथ दाभाडे यांच्या मुलाचा हरवलेला मोबाईल शोधून देण्यात पोलिसांना यश आले आहे. मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
२९ जानेवारी रोजी स्मॉल कॉज न्यायालयाचे न्यायाधीश दीनानाथ दाभाडे यांचा मुलगा आदित्य दीनानाथ दाभाडे (१५) याने मोबाईल
टॅक्सीत विसरल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र घोसाळकर यांनी अधिक तपास सुरु केला. अशात, टॅक्सीचालक येथील स्टेटस हॉटेल समोर टॅक्सी उभी करतो अशी माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने तेथून टॅक्सीचालकाला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने मोबाईल पोलिसांना दिला. प्रवासी टॅक्सीत मोबाईल विसरल्याने तो मोबाईल स्वतःकड़े ठेवल्याचे पोलिसांना सांगितले.