लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत स्टंटबाज करणारे मुंबई पोलिसांच्या रडारवर असून, त्यांची धरपकड सुरू आहे. आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
जीवघेण्या ‘बाईक रेसिंग’, ‘स्टंट’ना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. यात गेल्या आठवड्यात ९० हून अधिक दुचाकी जप्त केल्या आणि दीडशेहून अधिक जणांवर कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत रात्री सुरू होणाऱ्या दुचाकी स्पर्धा, स्टंटबाजीबाबत तक्रारी वाहतूक पोलिसांना प्राप्त होत होत्या. स्पर्धा, स्टंट करणारे तरुण स्वतःसह, इतरांच्या जीवास धोकादायक ठरू शकतात. ही जाणीव तरुणांना, त्यांच्या पालकांना व्हावी, या उद्देशाने विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, त्यानुसार कारवाई सुरू आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने वाहतूक पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे.