Join us  

विशेष फेरीसंदर्भात विद्यार्थी, पालक संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 1:26 AM

अकरावी प्रवेश प्रक्रिया; संकेतस्थळावर सूचना नसल्याने गोंधळात वाढ

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी दिलेली मुदतवाढ बुधवारी संपली असून, आता प्रवेशाची विशेष फेरी होणार आहे. मात्र, मुदतवाढीमुळे विशेष फेरीचे वेळापत्रक कोलमडले असून, पुढील प्रवेशाच्या फेरीचे सुधारित वेळापत्रक गुरुवार किंवा शुक्रवारी जाहीर करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम आहे.अकरावी प्रवेशाच्या तीन फेºया पूर्ण झाल्या असल्या, तरी पसंतीचे महाविद्यालय न मिळणे किंवा प्रवेशाची मुदत संपणे अशा कारणांमुळे अनेक विद्यार्थी अजूनही अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. ते प्रवेशाच्या विशेष फेरीची वाट पाहत आहेत. ही फेरी ९ आॅगस्ट रोजी होणार होती. मात्र, शहरातील अतिवृष्टीमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पालक, विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून मुदतवाढ देण्यात आली होती. यामुळे विशेष फेरीसाठी अर्ज करण्याच्या आणि या फेरीच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. मात्र, याबद्दल कोणतीही सूचना अद्याप प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर देण्यात न आल्याने विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत. यासंबंधी उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सुधारित वेळापत्रक गुरुवार किंवा शुक्रवारी जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.पालकांमध्ये नाराजीतिसºया यादीनंतरही अद्याप बहुतांश विद्यार्थी प्रवेशाविना असल्याने, महाविद्यालयांचेही ७० टक्के प्रवेश पूर्ण होऊ शकलेले नाहीत.यामुळे शहरातील अनेक महाविद्यालये आॅगस्ट महिना उजाडूनही सुरू झाली नसल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा नाराजीचा सूर पालकांमध्ये आहे. शिवाय अकरावीच्या संपूर्ण शैक्षणिक वर्षात परीक्षांचे नियोजन कसे करावे, असा पेचही महाविद्यालयांच्या प्राचार्यांसमोर आहे.