Join us  

विधि शाखेच्या ६०/४० पॅटर्नला विद्यार्थ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 5:19 AM

मुंबई विद्यापीठाने विधि (लॉ) शाखेच्या परीक्षा पद्धतीत बदल करून ६०/४० हा नवा पॅटर्न सुरू केला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने विधि (लॉ) शाखेच्या परीक्षा पद्धतीत बदल करून ६०/४० हा नवा पॅटर्न सुरू केला आहे. याविरोधात स्टुडण्ट लॉ कौन्सिल या संघटनेच्या माध्यमातून १८ सप्टेंबरला विद्यापीठातील आंबेडकर भवनासमोर विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. विधि शाखेतील अभ्यासक्रमांसाठी आता ६० गुणांच्या परीक्षेत १८ तर ४० गुणांच्या परीक्षेत १२ गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असतील. उत्तीर्ण होणे सोपे होणार असले तरी गुणवत्ता ढासळेल, असे संघटनांचे म्हणणे आहे. तसेच अर्धे गुण देण्याचा अधिकार महाविद्यालयांना असल्याने गुण देताना ते मनमानी करू शकतात, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे.

टॅग्स :विद्यापीठ