विद्यार्थ्यांनो, डोन्ट बी क्वारनटेन्शन्ड...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 04:57 PM2020-04-12T16:57:36+5:302020-04-12T16:58:06+5:30

क्वारंटाईन काळात मानसिक आरोग्य, संतुलन कसे संतुलित राखता येईल याच्या मार्गदर्शनासाठी तज्ञांची  क्वारनटेन्शन्ड ही सिरीज सुरु केली असून त्यांनी विद्यार्थ्याना विविध पोस्टच्या माध्यमातून समुपदेशन केले.

Students, Don't Be Quarantined ...! | विद्यार्थ्यांनो, डोन्ट बी क्वारनटेन्शन्ड...!

विद्यार्थ्यांनो, डोन्ट बी क्वारनटेन्शन्ड...!

googlenewsNext

सीमा महांगडे

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस घरातच रहावे लागणार आहे. या काळामध्ये सगळ्यांनीच आपले मानसिक आरोग्य निरोगी ठेवणे फार महत्वाचे असून या कालावधीत मानसिक ताणतणाव टाळणे खूप गरजेचे आहे.अनेक विद्यार्थी हॉस्टेल्समध्ये अडकून पडले आहेत. अनेकांच्या प्लेसमेंट ऑफर्स रद्द झाल्या आहेत. अनेकांना शेवटच्या वर्षाच्या आले आहे, तर अनेकांना पुढील वर्षीच्या अभ्यासाचे. विद्यार्थ्यांच्या या अशा अनेक प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आणि राज्यात लॉक डाउन झाले म्हणून तुम्ही स्वतःला मनाचे लॉकडाऊन करून घेऊ नये यासाठी आयआयटी बॉम्बेच्या एनएसएस विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी क्वारंटाईन काळात मानसिक आरोग्य, संतुलन कसे संतुलित राखता येईल याच्या मार्गदर्शनासाठी तज्ञांची  क्वारनटेन्शन्ड ही सिरीज सुरु केली असून त्यांनी विद्यार्थ्याना विविध पोस्टच्या माध्यमातून समुपदेशन केले.  

लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला असून यामुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षक साऱ्यांचेच शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. याच काळात विद्यार्थ्यांच्या अनेक प्लेसमेंट रद्द झाल्या आहेत, होत आहेत. अनेकांच्या महत्त्वाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. यानेक विद्यार्थी आपल्या घरी जाऊ शकत नसल्याने हॉस्टेलवर अडकले आहेत. अशा विद्यार्थ्यांना मानसिक समुपदेशनाची गरज असल्याने आयआयटीच्या एनएसएस विभागाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आय केअर , आयआयटी बॉम्बेच्या मानसिक आरोग्याच्या समुपदेशिका  शिवानी मनचंदा यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस विभागाच्या ११ विद्यार्थ्यांच्या टीमने या उपक्रमाचे आयोजन केले. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन, त्यांना योग्य मार्गदर्शन या उपक्रमातून करण्यात आले आहे. या सिरीजमध्ये ६ विविध पोस्टच्या माध्यमातून विद्यार्थी सामोरे जात असलेल्या मानसिक आरोग्याच्या समस्याचे निराकरण करण्यात आले. या पुढेही विद्यार्थ्यांना आल्यास किंवा मानसिक आरोग्य हाताळण्यासाठी काही मदत  हवी असल्यास  काम करू आणि योग्य मार्गदर्शन करू अशी माहिती एनएसएस विभाग सदस्य वैभव चंदन याने दिली.

सोशल मीडियाचे आणि त्याच्या विविध प्रकारच्या वापराचे आपल्या मानसिक आरोग्यावर कसे आणि किती परिणाम होतात, रोजच्या दैनंदिन जीवनात हजारोंच्या संख्येत फेक न्यूज आपल्यापर्यंत पोहचत असतात. या फेक न्यूजशी आपण कसे डील करायला हवे , त्याबाबत कोणती खबरदारी घ्यायला हवी यासंदर्भातील मार्दर्शन या उपक्रमातून देण्यात आले. सोबतच या कठीण काळात जॉब ऑफर्स , इंटर्नशिप रद्द झाल्या आहेत , तेव्हा विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कसा करावा, या वेळेत भविष्यात उपयुक्त  असे काय करता येईल याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या क्वारंटाईन काळात विद्यार्थ्यांनी मनाला लॉकडाऊन न करता भविष्यासाठी याचा वापर कसा करावा याचे समुपदेशन या एनएसएस क्वारंटटेन्शनड या उपक्रमातून करण्यात आले.    

 

Web Title: Students, Don't Be Quarantined ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.