Join us  

निकाल न मिळाल्याने विद्यार्थी त्रस्त, अद्यापही ९० निकाल राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 2:54 AM

मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबर रोजी सर्व निकाल जाहीर केल्याची घोषणा केली. ४७७ अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यापीठाने निश्वास सोडला, पण अजूनही विद्यार्थी स्वत:च्या निकालाच्या शोधात आहेत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबर रोजी सर्व निकाल जाहीर केल्याची घोषणा केली. ४७७ अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यापीठाने निश्वास सोडला, पण अजूनही विद्यार्थी स्वत:च्या निकालाच्या शोधात आहेत. विद्यापीठाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अद्याप ९० निकाल राखीव ठेवले आहेत, पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून काहीच माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत.मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा भवनात आजही विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत ताटकळताना दिसत आहेत. मुंबई विद्यापीठाने मार्च-एप्रिल महिन्यांत घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने केली. आॅनलाइन तपासणीचा खरा गोंधळ हा निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यावर दिसू लागला, पण नाव न सांगण्याच्या अटीवर विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपासून मी निकाचा फॉलोअप घेत आहे, पण आजही माझा निकाल जाहीर केलेला नाही. महाविद्यालयात विचारणा केल्यास विद्यापीठात जाऊन विचारा, असे सांगतात. विद्यापीठात आल्यावर अधिकारी जागेवर नसतात. अधिकाºयांना भेटण्यासाठी सुरक्षा रक्षक जाऊ देत नाहीत. आता निकाल मिळालाच नाही, तर पुन्हा परीक्षा द्यावी लागणार. हे वर्ष वाया गेले आहेच, तरी विद्यापीठ शांत आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ