Join us  

‘आई, काळजी घे!’ अशी चिठ्ठी लिहून विद्यार्थ्याने संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 6:20 AM

‘आई, काळजी घे!’ अशी चिठ्ठी लिहून बारावीच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपविल्याची घटना माटुंगा लेबर कॅम्पमध्ये घडली.

मुंबई : ‘आई, काळजी घे!’ अशी चिठ्ठी लिहून बारावीच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपविल्याची घटना मंगळवारी माटुंगा लेबर कॅम्पमध्ये घडली. या प्रकरणी शाहू नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.धिरेन बहोत (१८) असे मृत तरुणाचे नाव असून तो माटुंगा लेबर कॅम्पमध्ये आईसोबत राहायचा. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. अभ्यासात हुशार असलेल्या धिरेनने मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरी कोणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली. घरी आलेल्या आईला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ सायन रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.घटनास्थळावर पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. त्यात, नैराश्यातून आत्महत्या करत असून याबाबत कुणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद आहे. ‘टेक केअर मदर’, असे धिरेनने चिठ्ठीत लिहिले आहे. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती शाहू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांनी दिली.

टॅग्स :आत्महत्या