Join us  

नाट्यक्षेत्राचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेणार - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:06 AM

राज्यातील नाट्यनिर्माते व नाट्य चळवळीसमोरील समस्यांसंदर्भात मंगळवारी (दि. २२) त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.शासकीय ...

राज्यातील नाट्यनिर्माते व नाट्य चळवळीसमोरील समस्यांसंदर्भात मंगळवारी (दि. २२) त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शासकीय नाट्यगृहात नाट्यप्रयोग आणि नाटकांच्या तालमींसाठी नाट्यसंस्थांना भाडेसवलत, प्रयोगांसाठी आलेल्या नाट्यकलावंतांना शासकीय विश्रामगृहात सवलतीसह प्राधान्य, नाट्यसंस्थेच्या बसेस, टेम्पोंना टोलनाक्यांवर टोलमाफी, बस-टेम्पो पार्किंगसह नाटकाचे सेट ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करणे आदी मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी संबंधित विभागांना दिले.

प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांच्या स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना बक्षिसांसह सवलती देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

या बैठकीत कामगारमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव दिलीप पांढरपट्टे, अभिनेते व नाट्यनिर्माते प्रशांत दामले, दिलीप जाधव आदी मान्यवर सहभागी झाले होते.