Join us

विद्यापीठाचे अत्याधुनिक ग्रंथालय

By admin | Updated: October 17, 2014 01:38 IST

मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात मॉडर्न नॉलेज रिसॉर्स सेंटरच्या (ग्रंथालय) बांधकामाला सुरुवात झाली आहे.

मुंबई :  मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात मॉडर्न नॉलेज रिसॉर्स सेंटरच्या (ग्रंथालय) बांधकामाला सुरुवात झाली आहे. अत्याधुनिक सेवा-सुविधायुक्त असलेले विद्यापीठातील हे पहिलेच ग्रंथालय आहे. याचे बांधकाम एका वर्षात पूर्ण होणार असून, या गं्रथालयातील अत्याधुनिक सेवा-सुविधांचा लाभ विद्याथ्र्याना घेता येणार आहे.
विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस (विद्यानगरी) परिसरात जवाहरलाल नेहरू ग्रंथालय आहे. यामध्ये सुमारे आठ लाखांहून अधिक दर्जेदार पुस्तके, रिसर्च जर्नल्स, रेफरन्स बुक्स उपलब्ध आहेत. परंतु हे ग्रंथालय मोडकळीस असल्याने विद्यापीठाने मॉडर्न नॉलेज रिसॉर्स सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कलिना कॅम्पस येथे अत्याधुनिक ‘मॉडर्न नॉलेज रिसॉर्स सेंटर’ उभारण्यात येत असून, येत्या वर्षभरात हे ग्रंथालय उभे राहणार आहे. हे ग्रंथालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून, या ग्रंथालयामध्ये आठ लाखांहून अधिक पुस्तके, जर्नल्स, रेफरन्स बुक्स ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहेत. 
त्याचप्रमाणो इ-लायब्ररी, ऑडिओ-व्हिज्युअल रूम, स्पेशल रिडिंग रूम, मल्टीमीडिया लर्निग सेंटर, डिजिटल आणि प्रिंट रिसॉर्सेस, स्पेशल कॉन्फरन्स रूम, ओपन स्पेस, वाय-फाय अशा अनेक सोयी-सुविधांनी सुसज्ज असे ग्रंथालय असणार आहे. हे ग्रंथालय ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेवर आधारित आहे. ग्रीन बिल्डिंगच्या वैशिष्टय़ांनुसार या सेंटरमध्ये पुरेपूर नैसर्गिक प्रकाश व्यवस्था, खेळती हवा, पूर्व-पश्चिम दिशा, प्री-फेब्रीकेटेड स्टील वेब, काल्पीज रुफ मटेरिएल, वातावरण नियंत्रणासाठीचे लॅण्डस्केप बांधकाम अशा बाबींचा वापर करण्यात आला असून, ते संपूर्ण संगणकीकृत असल्याचे विद्यापीठाचे उपकुलसचिव जनसंपर्क लीलाधर बनसोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
मॉडर्न नॉलेज रिसॉर्स सेंटरची वैशिष्टय़े :  इ-लायब्ररी, ऑडिओ-व्हिज्युअल रूम, स्पेशल रिडिंग रूम, मल्टीमीडिया लर्निग सेंटर, डिजिटल आणि प्रिंट रिसॉर्सेस, स्पेशल कॉन्फरन्स रूम, ओपन स्पेस, वाय-फाय
 
विद्यापीठाच्या दोन्ही ग्रंथालयांत असलेली प्राचीन आणि दुर्मीळ दर्जेदार पुस्तके डिजिटल फॉर्ममध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याशिवाय सेंटरमधील प्रबंध हे विद्यार्थी, शास्त्रज्ञ, संशोधकांसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच ई-सेवेसाठी ग्रंथालयात कॉम्प्युटरची सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.
 
ग्रंथालयाची ज्ञानसंपदा
पुस्तके7,51,837
टेक्स्टबुक्स14,904
रेफरन्स बुक्स11,168
बुक टाईटल्स6,99,208
स्पर्धा परीक्षा पुस्तके428
करंट जर्नल्स631
भारतीय जर्नल्स270
परदेशी जर्नल्स361
बॅक व्हॅल्युम जर्नल्स 75,344
ई-रिसॉर्सेस2,074
डेटाबेस5
ऑनलाइन जर्नल्स4,453
प्रबंध20228
हस्तलिखित9,900
युनो विशेष संग्रह12,280
जागतिक बँक30,104