Join us  

एसटी कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 2:00 AM

मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा; नव्याने भरती होणाºया कर्मचाºयांना मिळणार लाभ

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील १ लाख कर्मचाºयांच्या वेतन कराराची घोषणा कामगार दिनी होईल. मात्र त्यापूर्वीच परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी कनिष्ठ वेतनश्रेणीची पद्धत रद्द करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी महामंडळात भरती होणाºया कर्मचाºयांना १ वर्ष वेतनश्रेणीवर काम करणे बंधनकारक होते.एसटी महामंडळात नव्याने भरती होणाºया कर्मचाºयांना सुरुवातीला ५ वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करणे अनिवार्य होते. या काळात कर्मचाºयांची आर्थिक कुचंबणा होत असल्याचे महामंडळाच्या लक्षात आले. परिणामी कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी ३ वर्षांवर आला. यानंतर तो १ वर्षाचा करण्यात आला. सर्वात कमी वेतन असलेल्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी कनिष्ठ वेतनश्रेणी पद्धत रद्द करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री रावते यांनी केली. महामंडळात नव्याने भरती होणाºया कर्मचाºयांना याचा लाभ मिळेल.बैठकीत होणार निर्णयकनिष्ठ वेतनश्रेणीमुळे एक वर्ष तुटपुंज्या पगारावर कर्मचाºयांना काम करावे लागत होते. कनिष्ठ वेतनश्रेणी पद्धत रद्द करण्यात येईल. महामंडळाच्या आगामी संचालक बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे मंत्री रावते यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई