Speed up the BDD redevelopment project, action on the protesters | बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाला येणार गती, विरोध करणाऱ्यांवर कारवाई
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाला येणार गती, विरोध करणाऱ्यांवर कारवाई

मुंबई : राष्ट्रपती राजवटीचा बीडीडी प्रकल्पावर कोणताही परिणाम होणार नाही, प्रकल्प येत्या महिन्यापासून अत्यंत वेगाने कार्यान्वित होईल, असा विश्वास म्हाडाचे सभापती मधु चव्हाण यांनी नुकताच म्हाडातील बैठकीमध्ये व्यक्त केला आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास समितीसोबत म्हाडाचे सभापती आणि वरिष्ठ अधिकारी यांची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यात आली.
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला येत्या दीड महिन्यात सुरूवात करण्यात येईल. त्यासाठी रहिवाशांचे स्थलांतर वेगाने करण्यात येईल. ज्या रहिवाशांची आणि स्टॉलधारकांची पात्रता निश्चित झालेली नाही त्यांची पात्रता येत्या पंधरा दिवसांत निश्चित करून पात्रता यादी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहे. संक्रमण शिबीर करारनामा केलेल्या रहिवाशांना तातडीने स्थलांतरीत करण्यात येणार असून जे रहिवाशी करारनामा (रजिस्ट्रेशन ) करूनही स्थलांतरीत होत नाहीत़, अशा रहिवाशांची संक्रमण शिबीरातील राखीव सदनिका रद्द करून नव्याने रजिस्ट्रेशन झालेल्या इच्छुक रहिवाशांना ताबडतोब देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असा निर्णय सभापतींनी यावेळी घेतला.
ना.म.जोशी चाळीतील बीडीडी चाळींच्या दहापैकी चार इमारतींच्या पाडकामाला सुरूवात करून प्रत्यक्ष कामाला सुरूवातही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पाला अडसर ठरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे आता बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला खºया अर्थाने वेग येणार आहे.
बैठकीमध्ये वारसा नोंदी आणि ग्रामस्थांच्या खोल्यांबाबतही लवकरच रास्त निर्णय घेण्यात येऊन त्यांना स्थलांतरीत करण्याचे आदेश सभापतींनी यावेळी प्रशासनाला दिले. संक्रमण शिबीरातील वीज बील देयकांचा प्रश्नबाबत सकारात्मक चर्चा होवून तसे निर्देश संबंधित अधिकाºयांना यावेळी देण्यात आले. ९५ - अ कायद्याबाबतच्या सुनावण्या लवकरच संपत असून येत्या महिनाभरात या कायद्याची कडक अंलबजावणी करण्यात येईल, असा दावा यावेळी सभापती आणि प्रशासनाने केला.
भारत मिल येथील संक्रमण शिबीरात लवकरच प्रत्यक्ष भेट देवून तेथील किरकोळ समस्या सोडवण्याचे आश्वासनही मधु चव्हाण यांनी यावेळी दिले. या बेठकीला बीडीडी चाळ पुनर्विकास समिती आणि मोठ्या संख्येने रहिवाशी उपस्थित होते.

Web Title: Speed up the BDD redevelopment project, action on the protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.