कुठलेही ओळखपत्र नसलेल्यांसाठी दहिसरमध्ये विशेष लसीकरण मोहिम; मुंबईतील अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 04:07 PM2021-10-23T16:07:43+5:302021-10-23T16:08:11+5:30

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणतेही ओळखपत्र नसलेल्या नागरिकांकरिता ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. अनेकांनी याचा फायदा घेत लस घेतली.

Special vaccination campaign in Dahisar for those without any identity card; This is the first such venture in Mumbai | कुठलेही ओळखपत्र नसलेल्यांसाठी दहिसरमध्ये विशेष लसीकरण मोहिम; मुंबईतील अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम

कुठलेही ओळखपत्र नसलेल्यांसाठी दहिसरमध्ये विशेष लसीकरण मोहिम; मुंबईतील अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम

googlenewsNext

मुंबई-कोणतेही ओळखपत्र नसलेल्या नागरिकांसाठी दहिसरमध्ये विशेष लसीकरण मोहिम राबवण्यात आली. मुंबईतील अशाप्रकारचा हा  पहिलाच उपक्रम आहे. प्रभाग क्रमांक १च्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी  अभिषेक घोसाळकर यांच्या पुढाकाराने दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगरमध्ये आज ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणतेही ओळखपत्र नसलेल्या नागरिकांकरिता ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. अनेकांनी याचा फायदा घेत लस घेतली. आपल्या प्रभागात कुणीही नागरिक लसीपासून वंचित राहू नये यासाठी घोसाळकर यांनी पाठपुरावा केला होता. प्रभाग क्रमांक 1मध्ये आतापर्यंत ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती तेजस्वी घोसाळकर यांनी दिली.

याप्रसंगी माजी नगरसेवक मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, महिला संघटक ज्यूडीथ मेंडोसा तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Special vaccination campaign in Dahisar for those without any identity card; This is the first such venture in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.