चैत्यभूमीसह रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 05:30 AM2019-12-02T05:30:20+5:302019-12-02T05:30:47+5:30

६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखोंच्या संख्येने अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे दाखल होतात.

Special facilities for handicapped, handicapped at train stations including Chaityabhumi | चैत्यभूमीसह रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा

चैत्यभूमीसह रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा

Next

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सुरक्षा विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे. ४ डिसेंबर ते ७ डिसेंबर या दरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रत्येक चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखोंच्या संख्येने अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे दाखल होतात. या सर्व अनुयायांना दादर स्थानकातून ते चैत्यभूमीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर स्थानकावर तब्बल १ हजार २०० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यामधून आणि लोकलमधून अनुयायी उतरल्यावर त्यांना चैत्यभूमीकडे जाण्यासाठी मार्ग खुला करून देण्यासाठी फलाट, पादचारी पूल, लिफ्ट येथे पोलीस तैनात केले आहेत.
दादर स्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी ५०० पोलीस बाहेरील जिल्ह्यांतून आले आहेत. यासह रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने १०० जवान बाहेरून आले आहेत. त्यानुसार संपूर्ण नियोजनबद्ध व्यवस्था केली आहे. सतर्कता आणि सेवा पोलिसांकडून राबविली जाणार आहे. गर्दीचे नियोजन पूर्णपणे केले जाणार आहे, अशी माहिती दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितली. तसेच ४ ते ७ डिसेंबर या काळात प्रत्येक स्थानकावर फौजफाटा तैनात असणार आहे. यासह दादर स्थानकावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाचा पहारा आहे. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास थांबा पथकाद्वारे या अनुचित प्रकार दडपून टाकण्यात येईल. तर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना चैत्यभूमी कुठे आहे. हे माहिती पडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. यासह पोलिसांद्वारे गोंधळलेल्या व्यक्तींना इच्छितस्थळी जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

दिव्यांगांसाठी विशेष सुविधा
चैत्यभूमी येथे येणाºया दिव्यांगांसाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे. लोकल अथवा लांब पल्ल्यांच्या गाडीतून उतरल्यावर त्यांना व्हीलचेअर देण्यात येणार आहे. त्यांना सरकते जिने अथवा लिफ्टद्वारे पादचारी पुलावर नेऊन चैत्यभूमीच्या दिशेने नेण्यात येईल.

गर्दीच्या नियोजनावर भर
एकाच ठिकाणी जादा गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांद्वारे मार्गदर्शन करण्याचे येणार आहे. १० मेगा फोनद्वारे स्थानकावरील १ हजार २०० पोलीस सुरक्षा यंत्रणेशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे एका ठिकाणी गर्दी वाढल्यास तेथे जास्त पोलीस ताफा पोहोचून गर्दीचे विभाजन करेल.

Web Title: Special facilities for handicapped, handicapped at train stations including Chaityabhumi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.