Join us  

‘मराठी भाषा धोरण विनाविलंब जाहीर करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 6:48 AM

गेली अनेक वर्षे मराठी भाषा संवर्धनाच्या चळवळीशी संबंधित असलेले कार्यकर्ते आणि राज्याचे बहुचर्चित मराठी भाषा धोरण ठरविण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभाग असलेले मसुदा समितीचे सदस्य यांनी राज्याचे शिक्षणमंत्री व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठविले.

मुंबई : गेली अनेक वर्षे मराठी भाषा संवर्धनाच्या चळवळीशी संबंधित असलेले कार्यकर्ते आणि राज्याचे बहुचर्चित मराठी भाषा धोरण ठरविण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभाग असलेले मसुदा समितीचे सदस्य यांनी राज्याचे शिक्षणमंत्री व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठविले.मराठी भाषा धोरण सहा वर्षे धूळखात पडले आहे. या धोरणाबाबतच्या लोकभावना जाणून ते आता अधिक वेळ न लावता जाहीर करणे आवश्यक आहे, असे समितीतील सदस्य शांताराम दातार यांनी पत्रात म्हटले आहे. हे पत्र शांताराम दातार, डॉ. प्रकाश परब आणि श्याम जोशी यांनी मिळून लिहिले आहे. प्रलंबित मराठी भाषा धोरण येत्या महाराष्ट्र दिनापूर्वी किंवा किमान महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर जाहीर करावे आणि हे राज्य मराठीचे आहे, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवावे, असे या पत्रात म्हटले आहे.