Join us

‘ईडी’चे सोलापूर मुख्य केंद्र

By admin | Updated: April 18, 2016 01:46 IST

इफेड्रीन अर्थात ‘ईडी’ या पावडरचा साठा जप्त केलेली सोलापुरातील औषध कंपनी हीच भारतातील या अमली पदार्थाची मुख्य वितरण कंपनी असून केवळ भारतासहीत युरोपातील देश

- जितेंद्र कालेकर,  ठाणेइफेड्रीन अर्थात ‘ईडी’ या पावडरचा साठा जप्त केलेली सोलापुरातील औषध कंपनी हीच भारतातील या अमली पदार्थाची मुख्य वितरण कंपनी असून केवळ भारतासहीत युरोपातील देश आणि मलेशियामध्ये त्याचे वितरण या कंपनीतून केले जात होते. पोलिसांना आतापर्यंत १८ हजार ६२७ किलो ‘ईडी’चा साठा मिळाला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ७२ हजार कोटींपेक्षा अधिक आहे. कंपनीचा मालक आणि इफेड्रीन वितरणाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.सोलापूरच्या चिंचोळी एमआयडीसी भागात ‘एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड’च्या एका पडीक गोदामातून ‘ईडी’ वितरणाचे काम सुरू होते. संबंधित औषध कंपनी प्रतिष्ठित असल्यामुळे इथे असे काही चालत असेल, याबाबत तेथील कामगारांनाही माहिती नव्हती. कंपनीचा केमिस्ट धानेश्वर स्वामी आणि वरिष्ठ निर्मिती व्यवस्थापक राजेंद्र डिमरी यांनी रायगड जिल्ह्यातील सागर पोवळे आणि मयूर सुखदरे यांच्यावर ठाणे आणि मुंबईत ‘माल’ वितरणाची जबाबदारी सोपवली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची नेमकी किंमत किती आहे, याची या दोघांना माहिती नव्हती. ठाण्यात ते एखाद्या डीलरच्या शोधात होते. त्याचवेळी पोलीस निरीक्षक उत्तम शेळके आणि उपनिरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाच्या ते हाती लागले. त्यातूनच या संपूर्ण कंपनीचाच पर्दाफाश झाला.ज्या कंपनीत हा ‘उद्योग’ सुरू होता, ती एका नामांकित औषध कंपनीसाठी पक्क्या मालाची निर्मिती करीत होती. २००२ पर्यंत याठिकाणी सुमारे दीड ते दोन हजार कामगार कामावर होते. या कंपनीतून बनवल्या जाणाऱ्या औषधांवर अमेरिकेने बंदी घातली. कंपनीचे उत्पादन कमी झाले. कंपनी डबघाईला आल्याचे दाखवून हळूहळू कामगारकपात केली. सध्या कामगारांची संख्या अवघी १५० ते २०० आहे. बंदी घातलेल्या औषधामध्ये इफेड्रीनचा समावेश होता. सोलापूरमधील कंपनीकडे या औषधाचा साठा मोठ्या प्रमाणात तयार होता. नियमानुसार तो २००२ ते २००५ या कालावधीत या कंपनीने नष्ट करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता त्यावर प्रक्रिया करून ते औषध नशेसाठी विकण्यास स्वामी आणि त्याच्या साथीदारांनी सुरुवात केली. यातील काही कामगारांना कंपनी अमली पदार्थ तयार करीत असल्याची माहिती होती, तर काहींना याची सुतराम कल्पना नव्हती. कामगार आणि मालकाचीही कसून चौकशी केली जाणार आहे. पाच हजारांसाठी जाळ्यात फसलेठाण्यात ‘ईडी’ हा अमली पदार्थ विकण्याकरिता डीलरच्या शोधात असलेल्या सागर आणि मयूर यांनी थोड्या रकमेत स्वामीकडून हा माल खरेदी केला होता. या मालाची विक्री केल्यानंतर त्यांना पाच हजार रुपये मिळणार होते. अमली पदार्थ विक्रीचा आपला हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा त्या दोघांनी केला असला तरी गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री केल्याची माहिती सूत्रांनी दिली.इफेड्रीनचा असा व्हायचा वापऱ़़कंपनीतील इफेड्रीन वॉश करून ते वाळवले जात होते. त्यामुळे त्याचा पिवळा रंग जाऊन त्याला पांढरा रंग येत होता. हीच पांढरी पावडर चार हजार रुपये ग्रॅमने विक्री केली जात होती. हीच पावडर कोकेन, शीतपेये, आइस्क्रीम, बर्फीतून नशेसाठी वापरली जात होती.