पनवेल : चाकावर मातीचा गोळा ठेवल्यानंतर तिला आकार देण्याला ख:या अर्थाने सुरूवात होते. एका छोटय़ाशा मातीच्या गोळ्याला फिरत्या चाकावर अगदी वेगात आकार दिला जातो आणि ख:या अर्थाने सुरू होतो एका पणतीचा प्रकाशमय असा प्रवास. तिला आकार देण्यापासून ते तिच्यावर नक्षी घडवून भट्टीतून काढण्यार्पयतचा पणतीचा प्रवास हा तेवढाच लक्षवेधी बनत आहे.
पनवेलच्या युसूफ मेहरअली सेंटरमधील मातीकाम विभागात सध्या रंगताहेत ते मातीने भरलेले हात. हे हात घडवताहेत दिवाळी उजळविणारे वेगवेगळ्या आकारातील दिवे. कोणताही साचा नाही की डमी आकार नाही. मातीकाम विभागातील कारागिरांना त्यांच्या आवडीनुसार पणत्या दिवे साकारायला पूर्ण वाव. मग ज्याच्या त्याच्या कलेनुसार साकारल्या जातात त्या लक्षवेधी असे मॅजिक लँप, लामणदिवे, पणत्या.. असे बरेच काही. कुणाचा आकार कमी तर कुणाचा जास्त.. कुठल्या दिव्याची चोच निमुळती तर कुणाची चांगलीच कोरीव. चाकावर मातीचा गोळा ठेवल्यावर हाताच्या कल्पनेप्रमाणो फिरू लागते माती आणि अल्पावधीतच साकारते एक सुरेखशी पणती. त्यानंतर ख:या अर्थाने सुरू होतो पणतीचा आणखीन सुंदर बनण्याचा प्रवास. मातीला पणतीचा आकार दिल्यानंतर तिला नक्षी द्यायची असेल तर अगदी थोडय़ा वेळासाठी तिला उन्हात सुकवले जाते आणि त्यानंतर ओल्या मातीने तिच्यावर कलाकुसर केली जाते.
फिनीशिंगही केली जाते, त्यानंतर काही वेळ बाहेर ठेवून तिला घट्ट करण्यासाठी भट्टीमध्ये टाकली जाते. सुरूवातीला स्लो, त्यानंतर फास्ट आणि पुन्हा स्लो असे फायरिंग करून पणती अधिकाधिक घट्ट बनविली जाते. भट्टीतील या पणत्या बाहेर काढून त्या तापवलेल्या तापमानाप्रमाणोच हळूहळू थंड केल्या जातात आणि त्या पूर्ण थंड झाल्यानंतरच त्यांचे बाजारात पाठविण्यासाठी पॅकिंग केले जाते. (प्रतिनिधी)
पणत्यांचे प्रकारही बनलेत वैविध्यपूर्ण
1 पनवेलमधील युसूफ मेहेरअली सेंटरमध्ये दिवाळीतील पणत्या या नेहमीच आकर्षणाचा विषय ठरत आहे. मुंबई - गोवा महामार्गाजवळ असलेल्या या सेंटरमध्ये दरवर्षी पनवेल, पेण, अलिबाग, मुंबईमधील नागरिक पणत्यांच्या खरेदीसाठी येतात.
2पूर्णपणो नैसर्गिकरीत्या बनविल्या जाणा:या या पणत्या पँरोगोटा क्ले या मातीने बनविल्या जातात. दरवर्षी 2क् हजारहून अधिक पणत्या बनविल्या जातात. विविध आकाराच्या या पणत्या विविध पध्दतीने बनविल्या जात आहेत.
3दिवाळीव्यतिरिक्तही वर्षभर त्या बनत असतात. दिवाळीत या पणत्यांना दुपटीने मागणी असते. हस्तकौशल्यासह पॉवर व्हीलच्या सहाय्यानेही या पणत्या बनविल्या जातात, तसेच ऑर्डरनुसार त्या बनविल्या जातात.
गणोशोत्सवाच्या आधीपासूनच पणती बनवण्याच्या कामाला सुरूवात होते. पेण, पनवेलसह मुंबई, पुण्यार्पयत येथील पणत्या पोहोचल्या असून खासकरून पणत्यांसाठी दीड टन टेराकोटाची माती खास कर्नाटकहून दाखल झालेली आहे.