Join us  

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण, अपिलावरील निर्णय ठेवला हायकोर्टाने राखून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 5:28 AM

सोहराबुद्दीन बनावट चकमकप्रकरणी गुजरात, राजस्थानच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणा-या पाच याचिकांवरील सुनावणी सोमवारी पूर्ण झाल्याने उच्च न्यायालयाने या याचिकांवरील निर्णय राखून ठेवला.

मुंबई : सोहराबुद्दीन बनावट चकमकप्रकरणी गुजरात, राजस्थानच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणा-या पाच याचिकांवरील सुनावणी सोमवारी पूर्ण झाल्याने उच्च न्यायालयाने या याचिकांवरील निर्णय राखून ठेवला. न्या. ए.एम. बदर यांच्या खंडपीठापुढे या पाचही याचिकांवरील सुनावणी ४ जुलैपासून दैनंदिन सुरू होती. सोमवारी या पाचही याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाली.सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने राजस्थानचे आयपीएस अधिकारी राजकुमार पांडीयन आणि दिनेश एम.एन तसेच गुजरातचे माजी एटीएस प्रमुख डी. जी वंजारा यांच्या आरोपमुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याचसोबत या बनावट चकमक प्रकरणी सीबीआयने गुजरात पोलीस अधिकारी एन.के. आमीन व राजस्थानचे पोलीस हवालदार दलपतसिंग राठोड यांच्या आरोपमुक्ततेलाही आव्हान दिले आहे.

टॅग्स :न्यायालय