अंधेरीच्या राजा मंडळाची सामाजिक बांधिलकी; सीएम सहायता निधीस दिले पाच लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 01:25 PM2020-04-06T13:25:42+5:302020-04-06T13:40:51+5:30

समितीने सामाजिक बांधिलकी दाखवत येथील आझाद नगर येथील प्रत्येक गृहनिर्माण संस्थांना सॅनिटायझर,तसेच निर्जंतुक फवारणीसाठी केमिकल उपलब्ध करून दिले आहे.

The social commitment of the king of Andheri; Five lakh rupees was given to the Chief Minister's Aid Fund | अंधेरीच्या राजा मंडळाची सामाजिक बांधिलकी; सीएम सहायता निधीस दिले पाच लाख रुपये

अंधेरीच्या राजा मंडळाची सामाजिक बांधिलकी; सीएम सहायता निधीस दिले पाच लाख रुपये

Next

मुंबई:दरवर्षी संकष्टीला विसर्जन होणारा व नवसला पावणारा गणपती म्हणून अंधेरीच्या राजाची ख्याती आहे.राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अंधेरीचा राजाच्या आझाद नगर सार्वजनिक समितीने मुख्यमंत्री निधीस रु.५,०१,१११/- ( रुपये पाच लाख एक हजार एकशे एक.)सहायता निधी दिला आहे.मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यात सदर रक्कम समितीने ऑनलाइन ट्रान्स्फर केले. समितीचे प्रमुख मार्गदर्शक व माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर ( शैलेश) फणसे यांनी लोकमतला ही माहिती दिली.

समितीने सामाजिक बांधिलकी दाखवत येथील आझाद नगर येथील प्रत्येक गृहनिर्माण संस्थांना सॅनिटायझर,तसेच निर्जंतुक फवारणीसाठी केमिकल उपलब्ध करून दिले आहे.समितीच्या सदस्यांनी गरजू नागरिकांना वैयक्तिक मदत देखिल केली असल्याची माहिती फणसे यांनी दिली. तसेच येथील नागरिकांच्या मागणीनुसार घरपोच भाजपाला देखिल देण्याचा समितीचा प्रयत्न असल्याची माहिती खजिनदार सुबोध चिटणीस व सहखजिनदार सचिन नायक यांनी लोकमतला दिली.

Web Title: The social commitment of the king of Andheri; Five lakh rupees was given to the Chief Minister's Aid Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.